farmers protest pm modi : PM मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, ‘टीकाकारांचा सन्मान करतो, पण दुर्दैवाने…’


नवी दिल्लीः भारतीयांचे वेगाने होत असलेले लसीकरण हे धक्कादायक यश असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. देशा आता क्षेत्रातही स्वावलंबी होत चालला आहे. तंत्रज्ञान या लसीकरण मोहीमेचा कणा राहील, हे निश्चित केले जात आहे, असंही ते म्हणाले. सरकारच्या निर्णयांवर होत असलेल्या टीकेवरही पंतप्रधान मोदी बोलले. टीकेला आपण खूप महत्त्व देतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. देशातील ६९ टक्के लोकसंख्येला करोनाचा किमान एक तरी डोस मिळाला आहे. तर २५ टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी एका मासिकाला मुलाखत दिली आहे. आपल्या देशात करोनावरील लस नसती तर किती भयानक परिस्थिती असती याचा विचार करा? जगातील एका मोठ्या लोकसंख्येकडे अजूनही करोनावरील लस नाहीए. पण भारताच्या लसीकरण मोहीमेने मोठे यश मिळवले आहे. आज आपण या क्षेत्रात स्वावलंबी झालो आहोत, असं सांगत पंतप्रधान मोदींनी पूर्वी आपण एका विज्ञान संमेलानात जय जवान, जय किसान आणि जय विज्ञानचा नारा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.

टीकाकार आणि विरोधकांना दिले उत्तर

टीका आणि आरोपांमध्ये खूप फरक आहे. बहुतेक जण आरोपच करत आहेत. कारण त्यांच्याकडे मुद्द्यांवर बोलण्यासाठी फारसा वेळ नाहीए. कारण टीका ही गहन अभ्यासावर आधारित असते. आपण खुल्या मनाने टीकाकारांचा सन्मान करतो. पण दुर्दैवाने टीकाकारांची संख्या अतिशय कमी आहे. बहुतेक जण फक्त आरोपच करत असतात. समजांवर आधारित खेळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, असा टोला पंतप्रधान मोदींनी आरोप करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.

PM मोदी म्हणाले, ‘… बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल’

Corona Vaccination: भारतीयांना करोना लसीचा ‘बुस्टर’ डोस दिला जाणार? तज्ज्ञ म्हणतात…

टीका करण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण आजच्या वेगवान जगात लोकांना यासाठी वेळ नाही. म्हणूनच अनेकदा टीकाकारांचा अभावही जाणवतो, असं सांगत पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारलं आहे.

शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर बरसले पंतप्रदान मोदी

अनेक राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देतात, जाहीरनाम्यातही समावेश करतात. पण आश्वासन पूर्ण करण्याची वेळ येते, तेव्हा तेच पक्ष यू-टर्न घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या आश्वासनांविषयी सर्व गैरसमज आणि खोटे पसरवतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या सुधारणांना विरोध करणाऱ्यांकडे पाहिले तर तुम्हाला बौद्धिक दिवाळखोरी आणि राजकीय फसवणुकीचा खरा अर्थ दिसेल, असं प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलना आडून सरकारवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांना दिलं आहे. ‘ओपन’ मासिकाला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: