punjab congress crisis : पंजाब काँग्रेसमधील पेच सुटेना! सिद्धू, मुख्यमंत्री चन्नींचे मौन; काँग्रेस नेतेही गप्प


नवी दिल्लीः पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसतंय. नवज्योत सिंग सिद्धू यांची नाराजी दूर झाली की नाही? यावरील सस्पेन्स आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूविरोधात आघाडी उघडली आहे, पण त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे स्पष्ट नाही. दरम्यान, चन्नीसह पक्ष नेतृत्व थांबा आणि पाहाची रणनीती अवलंबत आहे.

सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नी यांच्यात चंदिगडच्या पंजाब भवनमध्ये ३० सप्टेंबरला बैठक झाली होती. समेट करण्याच्या उद्देशाने प्रभारी हरीश रावतही बैठकीत उपस्थित झाले होते. बैठक संपण्यापूर्वी काँग्रेस नेते भूपिंदर सिंग गोरा बाहेर आले. सर्वकाही आलबेल आहे आणि पत्रकार परिषद होईल, असं ते म्हणाले. पण यानंतर लगेचच सर्व नेते पंजाब भवनमधून आपापल्या वाहनातून निघू लागले. यानंतर पत्रकार परिषद ही शुक्रवारी होईल असं सांगण्यात आलं. पण शुक्रवारीही काँग्रेसकडून कुठलीही माहिती दिली गेली नाही. सिद्धू-मुख्यमंत्री चन्नी यांच्या बैठकीत एकमत होता होता राहिलं की काँग्रेस वेट अँड वॉचच्या रणनीतीवर चालत आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

amarinder singh : पंजाबमधील चन्नी सरकार संकटात येणार, अमरिंदर सिंग यांचा प्लान उघड?

अमरिंदर सिंग यांचे खुले आव्हान

मुख्यमंत्री चन्नी यांनी दिल्ली पंतप्रधान मोदींची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीनंतर चन्नी यांना सिद्धूंवर प्रश्न विचारला गेला. पण त्यांनी उत्तर देणं टाळलं. चन्नीही बोलले नाहीत आणि सिद्धूही गप्प आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही मौन धरून आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मात्र हल्ला सुरूच ठेवला आहे. सिद्धू जिथूनही निवडणूक लढवतील, तिथे त्यांना जिंकू देणार नाही, असं अमरिंदर सिंग यांनी आव्हान दिलं आहे.

channi meets pm : पंजाबमधील गदारोळादरम्यान मुख्यमंत्री चन्नी PM मोदींना भेटले; बोलले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: