मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये; चौकार अडविण्याच्या नादात झाली गंभीर दुखापत


रावळपिंडी : पाकिस्तान क्रिकेट संघातील डावखुरा फलंदाज इमाम-उल-हक नुकताच दुखापतग्रस्त झाला आहे. नॅशनल टी-२० कप २०२१ च्या एका सामन्यादरम्यान त्याच्या छातीला दुखापत झाली. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. दुखापत थोडी गंभीर असल्याचे समजताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. दिलासादायक गोष्ट म्हणजे इमाम दुखापतीतून लवकर बरा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इमाम सध्या नॅशनल टी-२० कप स्पर्धेत बलुचिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे.

वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

शुक्रवारी इमामच्या संघाचा सामना सदर्न पंजाबशी होता. हा सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. या सामन्यात सदर्न पंजाबचा फलंदाज शोएब मकसूदने मारलेला चेंडू सीमारेषेवर अडविताना इमाम बाउंड्री बोर्डला जाऊन धडकला. त्यामुळे त्याच्या छातीला दुखापत झाली. इमाम जखमी होताच संघाचे फिजिओथेरपिस्ट मैदानावर पोहोचले, पण त्याला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे इमामला रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने त्याच्या बरगडीला गंभीर मार लागला नाही.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न

दुखापतीमुळे इमाम फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. तरी संघाने कर्णधाराच्या अनुपस्थितीतही चांगली कामगिरी केली आणि २ गडी गमावत १७५ धावांचे लक्ष्य गाठत सामना जिंकला. बलुचिस्तानच्या विजयात अब्दुल बंगालझाई आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. बंगालजईने त्याच्या ४२ चेंडूत ५० धावा केल्या. तर शफीकनेही २८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर हारिस सोहेलने ३५ चेंडूत ४७ धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला.

वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित

नॅशनल टी-२० कपमध्ये इमामची खराब कामगिरी
आतापर्यंत इमामने ४ डावांमध्ये १०.२५ च्या सरासरीने फक्त ४१ धावा केल्या आहेत. त्याचा बलुचिस्तान संघ सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातही इमाम होता. तेथे त्याला ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. इमामने मालिकेच्या तिसऱ्या वनडेमध्ये ५६ धावा केल्या होत्या. इमाम पाकिस्तानसाठी ११ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: