bhupesh baghel : मुख्यमंत्री बघेल यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘छत्तीसगडचा ‘पंजाब’ कधीच होणार नाही’


रायपूरः पंजाब काँग्रेसमध्ये कलहाचा दुसरा अंक सुरू आहे. आता छत्तीसगडमधील काँग्रेस आमदारही दिल्ली भेटीवर आहेत. यामुळे छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारही अस्थिर होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. छत्तीसगडचा पंजाब होत आहे, असा टोला भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी मुख्यमंत्री बघेल ( bhupesh baghel ) यांना लगावला आहे. छत्तीसगड कधीही पंजाब होऊ शकत नाही, असं उत्तर मुख्यमंत्री बघेल यांनी रमण सिंह यांच्या टीकेला दिलं आहे. दिल्लीला जाणाऱ्या आमदारांवरही मुख्यमंत्र्यांनी बघेल यांनी स्पष्टीकरण दिलंय. छत्तीसगडचे काँग्रेसचे आमदार त्यांच्या इच्छेने जात आहेत. ते मोकळे आहेत. यामागे कुठलीही राजकीय हालचाल नाहीए, असा दावा बघेल यांनी केला.

पंजाबप्रमाणे छत्तीसगडमध्येही नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे अनेक आमदार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. भूपेश बघेल यांचे हे शक्तिप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे. पण हे आमदार स्वतःहून दिल्लीत जात आहेत. त्यामागे शक्तिप्रदर्शनाचा कुठलाही हेतू नाहीए, असं बघेल यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेस हायकमांडने वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री बघेल यांनी आभार मानले आहेत.

राज्यात दूरपर्यंत नेतृत्व बदलाचा कुठलाही प्रश्न नाही. बघेल यांच्या नेतृत्वात छत्तीसगडमधील सरकार पूर्ण ५ वर्षे चालेल. आम्ही छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी पी. एल. पुनिया यांच्या भेटीसाठी आलो आहोत. राहुल गांधींनी छत्तीसगड दौरा थोडा अधिक काळ वाढवावा. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, असं दिल्लीत दाखल झालेले आमदार बृहस्पत सिंह म्हणाले. दिल्लीत काँग्रेसचे जवळपास ३५ आमदार उपस्थित असल्याचा दावा बृहस्पत सिंह यांनी केला आहे. आम्ही छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी पी. एल. पुनिया आणि काँग्रेस हायकमांडला संध्याकाळी भेटणार आहोत, असंही ते म्हणाले.
punjab congress crisis : पंजाब काँग्रेसमधील पेच सुटेना! सिद्धू, मुख्यमंत्री चन्नींचे मौन; काँग्रेस नेतेही गप्प

आतापर्यंत २० आमदार दिल्लीला पोहोचले आहेत आणि जवळपास १० आमदार दिल्लीतून शुक्रवारी रात्री उशिरा छत्तीसगडमध्ये पोहोचले आहेत. छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. तसंच अडीच वर्षे बघेल यांना मुख्यमंत्रिपद आणि नंतर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी चर्चा पूर्वी झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी काही आमदार दिल्लीला पोहोचले. आपल्याला आतापर्यंत एकाही आमदाराने संपर्क साधलेला नाही, असं दिल्लीला पोहोचलेल्या आमदारांबद्दल काँग्रेसचे छत्तीसगड प्रभारी पीएल पुनिया यांनी गुरुवारी सांगितलं.

amarinder singh : पंजाबमधील चन्नी सरकार संकटात येणार, अमरिंदर सिंग यांचा प्लान उघड?

आमदार कुठेही जाऊ शकत नाहीत का? प्रत्येक ठिकाणी राजकारण केलं जाऊ नये. एखादी व्यक्ती कुठेतरी गेली असेल तर त्याला राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये, असं बघेल म्हणाले. तर यात काय मुद्दा आहे? आमदार दिल्लीला गेले तर यात काय हरकत आहे? असाच प्रकार उत्तर प्रदेशात अनेक दिवस चालला. छत्तीसगडमध्ये नवीन काय आहे?, असं उत्तर टी. एस. सिंह देव यांनी गुरुवारी दिलं.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: