टोलनाका गोफणगुंडा

टोलनाका गोफणगुंडा
     टोलनाका 

एकमेकांवर रोज नवे नवे
आरोप प्रत्यारोप आहेत
हेच तर राजकारण आहे
सोयीनुसार संधी साधणे
हेच तर सत्तेचं गजकरण आहे !!

     गोफणगुंडा .....

भगीरथ प्रयत्न , कल्याणरावचे पक्षांतर
दादांचा दौरा करूनही
घड्याळाचे काटे पुढे सरकले नाहीत
विजयाची खात्री देणारे म्हणून
पक्ष श्रेष्ठींच्यापुढे जे जे मिरवत होते
ते आज कोठेही दिसत नाहीत
कोणीही काही केलं तरी
लिंबाच्या झाडाला आंबे लागत नाहीत “!!

       "सुप्रभात"

” खोटं बोलण्याने इतरांना फसवणूक केल्याचं क्षणीक समाधान मिळते पण यामुळेच आपली ओळख ,सत्व घालवून बसतो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे “!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: