गांधी जयंतीला ट्विटरवर ट्रेंड झाले ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’; भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले…


नवी दिल्लीः महात्मा गांधीजींची आज ( mahatma gandhi jayanti ) जयंती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि अनेक नेत्यांनी आज गांधीजींना आदरांजली वाहिली. पण महात्मा गांधीजींच्या जयंतीला दुसरीकडे सोशल मीडियावर वेगळाच ट्रेंड सुरू होता. महात्मा गांधींच्या जयंतीला ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’च्या ( nathuram godse ) ट्रेंडवरून भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. अशा बेजबादार वर्तनाने देशाची लाज काढू नका. अशांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे, असं वरुण गांधी म्हणाले.

भारत नेहमीच अध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. महात्मा गांधींनीच आपल्या देशाच्या अध्यात्मिक पायामध्ये भर घातली आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला, जी आजही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ‘गोडसे जिंदाबाद’ असे ट्विट करणारे बेजबाबदार आहेत आणि त्यांच्या या कृतीने देशाची लाज काढत आहेत, असं वरुण गांधी म्हणाले.

bhupesh baghel : मुख्यमंत्री बघेल यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘छत्तीसगडचा ‘पंजाब’ कधीच होणार नाही’

‘महात्मा गांधी आणि त्यांच्या आदर्शांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जो सन्मान मिळाला आहे, तो विसरता येणार नाही. ‘गोडसे जिंदाबाद’ असे ट्विट करणाऱ्यांची नावे घेऊन त्यांचीही जाहीरपणे लाज काढली पाहिजे. हा मूर्खपणा आहे, त्याला मुख्य प्रवाहात स्थान दिले जाऊ नये’, असं वरुण गांधी बोलले.

punjab congress crisis : पंजाब काँग्रेसमधील पेच सुटेना! सिद्धू, मुख्यमंत्री चन्नींचे मौन; काँग्रेस नेतेही गप्प

महात्मा गांधींच्या जयंतीला ट्विटरवर ‘नथूराम गोडसे जिंदाबाद’ ट्रेंडवर होते. उजव्या विचारसरणीच्या एका वर्गाकडून कायम नथूराम गोडसेचे गुणगाण गायले जाते. नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली होती. गांधीजींशी संबंधित दिनाला अशी टीका कायम होत असते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: