Delhi Capitals Won: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव; प्लेऑफची संधी नशिबावर अवलंबून


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर ४ विकेटनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सने विजयाचे लक्ष्य अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार मारून पार केले. मुंबई इंडियन्सच्या या पराभवामुळे त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता मुंबईला पुढील दोन्ही लढती राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवावा लागले. त्याच बरोबर इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. एकूणच गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे विजेतेपदाच्या हॅट्रिकचे स्वप्न भंग होण्याची शक्यता दिसत आहे.वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणारे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतले. शिखरला कायरन पोलार्डने ८ धावांवर धावबाद केले. तर क्रुणाल पंड्याने पृथ्वी शॉला ६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर कुल्टर नाईलने स्टीव्ह स्मिथला ९ धावांवर बोल्ड केले आणि दिल्लीची अवस्था ३ बाद ३० अशी केली. दिल्ली अवघड परिस्थितीत असताना श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषभ पंतने डाव सावरला. संघाचे अर्धशतक झाल्यानंतर जयंत यादवने पंतला २६ धावांवर बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

वाचा- IPL मधून या खेळाडूंना लागणार टी-२० वर्ल्डकपचा ‘जॅकपॉट’

पंतच्या जागी आलेल्या अक्षर पटेलचा अडथळा ट्रेंट बोल्टने दुर केला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ५ बाद ७७ अशी झाली. दुसऱ्या टाईम आऊटनंतर जसप्रीत बुमराहने (१४व्य ) पहिल्याच चेंडूवर हेटमायरला १५ धावांवर बाद केले. रोहित शर्माने त्याचा सोपा कॅच घेतला. अखेरच्या ३० चेंडूत दिल्लीला ३० धावांची गरज होती. मैदानात श्रेयस अय्यर आणि आर अश्विन हे फलंदाज होते. या दोघांनी विकेट न गमावता अखेरपर्यंत लढा दिला. दिल्लीला अखेरच्या षटकात ४ धावांची गरज होती. अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून विजय मिळून दिला.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली. पण मुंबईला पहिला धक्का बसला जेव्हा आवेश खानने रोहितला फक्त ७ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने डी कॉक सोबत चांगली भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी संघाला सावरेल असे वाटत असताना अक्षर पटेलने डी कॉकला १९ धावांवर माघारी पाठवले.

वाचा- IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम धोक्यात; या खेळाडूकडे सुवर्ण संधी

डी कॉकच्या जागी आलेल्या सौरभने सूर्यकुमार सोबत संघाला अर्धशतक करून दिले. ही जोडी अक्षर पटेल फोडली, त्याने सूर्यकुमारला बाद केले. त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या. यामुळे मुंबईचा अवस्था १०.३ षटकात ३ बाद ६८ अशी झाली होती.

चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सौरभ तिवारी संघाला अडचणीतून बाहेर काढेल असे वाटले. पण तो देखील १५ धावांवर बाद झाला. त्याला अक्षरनेच बाद केले. तिवारी पाठोपाठ धोकादायक कायरन पोलार्डला नॉर्जेने ६ धावांवर बाद केले. मुंबईचा निम्मा संघ ८७ धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. मैदानात असलेले पंड्या बंधू काही तरी कमाल करतील असे वाटले होते. पण हार्दिक १७ धावांवर बाद झाला. त्याला आवेशने बाद केले. त्याच षटकात आवेशने कुल्टर नाईलला बाद करून मुंबईला सातवा धक्का दिला. दिल्लीकडून अक्षर पटेलने ४ षटकात २१ धावात ३ विकेट घेतल्या. आवेश खानने १५ धावात ३ विकेट घेतल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: