vaccination in thane: ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर १०,०१० करोना प्रतिबंधक लसीकरण
हायलाइट्स:
- ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर १०,०१० लोकांचे लसीकरण.
- देशात कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारे लसीकरण झाले आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन.
नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने हा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा- कोस्टल रोड कामातील भ्रष्टाचाराचे आरोप अयोग्य; पालिकेचा पुन्हा खुलासा
आज सकाळी ९ वाजता दिव्यातील एसएमजी शाळेचे आवारात खासदार लस महोत्सवाला सुरुवात झाली. दोन सत्रात करण्यात आलेल्या या लस महोत्सवामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १० हजार १० लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट; ‘अशी’ आहे ताजी स्थिती!
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक नगरसेवक, नगरसेविका यांच्या सहकार्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पेशंट निरीक्षक यांच्या शिस्तबद्ध नियोजनात आजचे लसीकरण पार पडले. आज एकाच वेळी १० हजार नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त दिवावासीयांनी समाधान व्यक्त केले.
क्लिक करा आणि वाचा- ‘सर्व आरोप खोटे’; कथित ऑडिओक्लिप प्रकरणी रामदास कदम कोर्टात जाणार