२२ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा फॅन झाला सेहवाग; म्हणाला, ‘तो टीम इंडियाचं भविष्य आहे’


नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत चमकदार कामगिरी केली आहे. अर्शदीपने ४ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग देखील अर्शदीपच्या कामगिरीवर खूश झाला आहे. अर्शदीप हा एक प्रतिभावान गोलंदाज आहे आणि बीसीसीआयने त्याची प्रतिभा वाया जाऊ देऊ नये. अर्शदीपसारख्या गोलंदाजाची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे. अर्शदीपने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या दुबई इथं झालेल्या सामन्यात ३२ धावांत ५ विकेट घेतल्या आणि या हंगामात अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी हर्षल पटेलने आयपीएल २०२१ मध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत.

वाचा- मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये; चौकार अडविण्याच्या नादात झाली गंभीर दुखापत

अर्शदीपने झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचे धडे गिरवले आहेत. फक्त ३ दिवसात तो चेंडू स्विंग करायला शिकला, यावरून तो किती हुशार गोलंदाज आहे, याचा अंदाज येतो. सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, अर्शदीप ज्या संघासाठी खेळेल त्या संघासाठी तो फायदेशीर ठरेल.

वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

अर्शदीप भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो
सेहवाग पुढे म्हणाला की, डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू ज्या प्रकारे ऑफ स्टंपपासून दूर पडल्यानंतर आत येतो, त्याच पद्धतीने अर्शदीप सध्या गोलंदाजी करत आहे. त्याने झहीर खानसोबत फक्त तीन दिवस काम केले. इतक्या कमी वेळात तो चेंडू स्विंग करायला शिकू शकतो, तर तुम्ही कल्पना करू शकता की तो किती गुणवान गोलंदाज आहे. जर तो टीम इंडियासोबत राहिला, तर त्याचा नक्कीच संघाला फायदा होऊ शकेल. अशा परिस्थितीत अर्शदीपची प्रतिभा नष्ट होणार नाही, याची पूर्ण काळजी बीसीसीआयने घ्यावी.

वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित

अर्शदीप भारताकडून खेळू शकतो
सेहवाग म्हणाला की, जर अर्शदीप त्याच्या गोलंदाजीवर अशीच मेहनत करत राहिला, तर तो लवकरच भारतीय संघातूनही खेळू शकतो. अर्शदीप एक प्रतीभावान गोलंदाज आहे आणि तो आता ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता तो लवकरच भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना दिसेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: