Video : ३१ चेंडूत वादळी शतक; २६ वर्षीय खेळाडूनं केला पराक्रम
महत्वाची गोष्ट म्हणजे, इंग्लंड इलेव्हनच्या या विजयात फक्त एका फलंदाजाने धुमाकूळ घातला होता. त्या फलंदाजाने मैदानावर अक्षरश: आग लावली होती. चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजाने इटलीच्या ६ गोलंदाजांना घाम फोडला. ३०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या या युवा खेळाडूची खेळी किती स्फोटक होती याचा अंदाज लावू शकता.
वाचा- मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये; चौकार अडविण्याच्या नादात झाली गंभीर दुखापत
२६ वर्षीय फलंदाजाचे धडाकेबाज शतक
इंग्लंड इलेव्हनसाठी सलामीला आलेल्या २६ वर्षीय डॅन लिंकोलनने फक्त ३१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने १०५ धावांची नाबाद खेळी खेळली. इटलीविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात त्याने ३३८.७० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ षटकार आणि ८ चौकार मारले. १०५ धावांच्या नाबाद खेळीत त्याने १९ चेंडूत ९८ धावा केल्या. या स्फोटक खेळीमुळे डॅनने एकट्याने इटालियन संघाने दिलेल्या लक्ष्याच्या अर्ध्याहून अधिक धावा केल्या.
वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित
कर्णधारांनी केल्या सर्वाधिक धावा
दरम्यान, इटलीच्या संघाने १० षटकांत ६ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येत संघाचा कर्णधार बलजीत सिंग याने सर्वाधिक ६२ धावा केल्या. आश्चर्यकारक गोष्ट अशी की, जेव्हा इंग्लंड इलेव्हनचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा त्यांचा कर्णधार डॅन लिंकोलननेही कर्णधार पदाला साजेशी खेळी केली.