रिपब्लिकन पक्षाच्या राज्यकार्यकारिणीची दि.4 ऑक्टोबर रोजी बैठक – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले मार्गदर्शन करणार – रिपाइंचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राज्य कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे आयोजित केली असून या बैठकीस रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती रिपाइंचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे. राज्य कार्याकरिणी च्या बैठकीची पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजक रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली आहे.

मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील नाशिक;पुणे; नवी मुंबई ;उल्हासनगर आदी महानगरपालिका आणि नगर पालिका निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाची रणनीती ठरविण्याबाबत राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत विचार विमर्श करण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका आणि नगर पालिका निवडणुकीबाबत या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती रिपाइं चे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर आणि राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे.
राज्य कार्यकारिणी च्या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला; यांच्यासह राष्ट्रीय कार्यकरिणीचे सर्व पदाधिकारी; राज्य कार्याकरिणी चे प्रमुख पदाधिकारी; प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस आणि फक्त जिल्हा अध्यक्ष यांनीच उपस्थित राहावे. कोरोनाच्या प्रसाराला निर्बंध घालणारे नियम पाळून ही बैठक आयोजित केली असल्याने निवडक पदाधिकाऱ्यांनीच राज्य कार्यकारिणी च्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष ना रामदास आठवले यांनी दिले आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान मागील वर्षभरापासुन सुरू असून त्याचा आढावा राज्य कार्याकरिणीच्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले घेणार आहेत. पक्षाच्या सदस्य नोंदणी नंतर पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणूकांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: