ब्रिटनमध्ये इंधन संकट; अखेर लष्करामार्फत होणार इंधन वितरण


लंडन : ट्रकचालकांची कमतरता असल्याने विस्कळित झालेल्या इंधन तुटवड्यावर उपाय म्हणून ब्रिटनमध्ये सोमवारपासून इंधन वितरण लष्करामार्फत करण्यात येणार आहे. ब्रिटीश लष्कराचे दोनशे सैनिक इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत झाले आहेत. या सैनिकांना इंधन पुरवठा करणारे टँकर चालविण्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्या ब्रिटनमध्ये असणाऱ्या परदेशी टँकरचालकांच्या व्हिसाच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. अभूतपूर्व इंधन टंचाईमुळे ब्रिटनमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक पेट्रोलपंप बंद असून जीवनावश्यक वस्तूंचा होणारा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.

टँकरचालकांची कमतरता का?

करोनामुळे बहुसंख्य टँकरचालकांनी निवृत्ती घेतली. तर, अनेक परदेशी चालक मायदेशी परतले. लॉकडाउनमुळे चालकांचे प्रशिक्षण आणि परीक्षा घेण्यातही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. परिणामी संपूर्ण ब्रिटनमध्ये ट्रकचालकांचा तुटवडा निर्माण झाला. काही महिन्यांआधी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महासंघातील सदस्य देशांतील ट्रकचालक एकमेकांच्या देशात जाऊ शकत होते. मात्र, ब्रिटन महासंघाबाहेर बाहेर पडल्याने ही मुभा संपुष्टात आली; तसेच काही हजारो चालकांना ब्रिटनमधून त्यांच्या मायदेशी जावे लागले. त्याच्या परिणामी आधीच कर्मचारी टंचाई भेडसावणाऱ्या ब्रिटनची अधिक कोंडी झाली.

ब्रिटनमधील ९० टक्के पेट्रोल पंप बंद; ‘या’ कारणाने अभूतपूर्व इंधन संकट

व्हिसाच्या मुदतीत वाढ

विस्कळित इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने परदेशी चालकांच्या व्हिसाला मुदतवाढ देण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार परदेशी ट्रकचालकांना या व्हिसा मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. यातील ३०० चालक परदेशांतून ब्रिटनमध्ये येऊ शकणार आहेत आणि ते मार्चअखेरपर्यंत राहू शकतील. सुमारे ४७०० जणांना अन्नपदार्थांची वाहतूक करणारे ट्रकचालक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतील आणि फेब्रुवारीअखेरपर्यंत राहू शकतील.

इंधन टंचाई का?

टँकरचालकांची कमतरता निर्माण झाल्याने इंधन पुरवठा विस्कळित झाला. त्याच वेळी अचानकपणे मागणीतही वाढ झाल्याने देशात इंधनटंचाई निर्माण झाली.

भारताचेही जशास तसे; ब्रिटिश नागरिकांना १० दिवस विलगीकरण सक्तीचे

जनजीवन विस्कळित

इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने बहुसंख्य ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. काही भागांमध्ये अराजकसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. वस्तूंच्या पुरवठ्या अभावी अनेक मॉल आणि सुपरमार्केटमध्ये खडखडाट झाला.

चीनमध्ये भीषण वीज संकट; कारखाने मॉल्स बंद, वीज वापरावर निर्बंध
गेल्या आठवडाभरापासून इंधनपुरवठा विस्कळित होता. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पेट्रोलच्या साठ्यावर कोणताही ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी नेहमीप्रमाणे इंधन घेणे आवश्यक आहे. लवकरच इंधनपुरवठ्याबाबत परिस्थिती पूर्ववत होईल असे ब्रिटनचे उद्योगमंत्री क्वासी क्वारतेंग यांनी म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: