भारतीयांना मिळणार हायस्पीड इंटरनेट; जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक सुरू करणार ब्रॉडबँड सेवा


हायलाइट्स:

  • स्टारलिंक भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.
  • डिसेंबर २०२२ पासून ते ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
  • कंपनी सध्या दोन लाख सक्रिय टर्मिनल्ससाठी भारत सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे.

नवी दिल्ली : एलन मस्क यांच्या नेतृत्वातील कंपनी स्पेस एक्सचा सॅटेलाइट ब्रॉडबँड विभाग स्टारलिंक भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. डिसेंबर २०२२ पासून ते ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. कंपनी सध्या दोन लाख सक्रिय टर्मिनल्ससाठी भारत सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये दोन लाख टर्मिनल उपलब्ध करण्याचे लक्ष्य
स्टारलिंकचे भारतातील संचालक संजय भार्गव यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहिल्याच दिवशी कंपनीला भारतात ५ हजार प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. आणि कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास तयार आहे. भार्गव पुढे म्हणाले की, डिसेंबर २०२२ पर्यंत भारतात दोन लाख टर्मिनल उपलब्ध करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. जर त्यांना भारत सरकारची मान्यता मिळाली नाही, तर वास्तवात ही संख्या कमी होऊ शकते किंवा शून्यही राहू शकते. पण ते दोन लाखांचा आकडा पार करतील, अशी शक्यता खूप कमी नाही.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा उडाला भडका
स्टारलिंक ग्राहकांना प्राधान्य यादीचा भाग होण्यासाठी ९९ डॉलर किंवा ७,३५० रुपयांची ठेव घेत आहे. सेवा सुरू झाल्यानंतर प्री-ऑर्डर डिपॉझिट मासिक शुल्कासोबत जुळवून घेतले जाईल. नागरिक त्यांचा परतावा देखील घेऊ शकतात, पण ते त्यांचा प्रायोरिटी स्टेटस गमावतील.

कंपनीचा दावा आहे की, ते बीटा स्टेजमध्ये ५० ते १५० मेगाबाइटच्या रेंजमध्ये डेटा स्पीड देतील. ब्रॉडबँड विभागात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि भारती ग्रुप समर्थित वनवेब यांच्याशी कंपनी थेट स्पर्धा करेल.

सरकारी तिजोरीला अच्छे दिन! सप्टेंबरमध्ये ‘जीएसटी’मधून मिळाले इतके लाख कोटी
सरकारकडून मंजुरी मिळवणे होईल सोपे
भार्गव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोव्यातील एका दुर्गम भागाने स्टारलिंकची मागणी केली आहे. शंभर टक्के ब्रॉडबँड सेवा हव्या असलेल्या ग्रामीण भागासोबत काम करण्यास कंपनी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी बहुतेकांना टेरेस्ट्रियल ब्रॉडबँडद्वारे सेवा उपलब्ध केली जाईल, पण ज्या भागात सेवा पुरवणे कठीण आहे, तेथे सेटकॉम प्रोव्हायडर्ससारखे स्टारलिंक दिसेल.

जेव्हा भारतातील एक ग्रामीण भाग स्वतःला १०० टक्के ब्रॉडबँड असल्याचे जाहीर करेल, त्या दिवसाची वाट पाहत असल्याचे भार्गव म्हणाले. स्टारलिंक आणि इतर ब्रॉडबँड प्रदात्यांसह (प्रोव्हायडर्स) काम करू इच्छिणारे राजकारणी आणि नोकरशहा माझ्याशी संपर्क साधू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: