श्रीलंकेतील बंदराचे कंत्राट अदानींना; भारताचा चीनला शह, अशी केली कुरघोडी


नवी दिल्ली/कोलंबो: श्रीलंकेने ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’साठी (डब्ल्यूसीटी) ‘अदानी ग्रुप’बरोबर नुकताच ७० कोटी डॉलरचा करार केला आहे. भारतातील कंपनीच्या श्रीलंकेतील अस्तित्वामुळे भारताचे सामरिक हितसंबंध राखण्यास चालना मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने ‘ईस्ट कंटेनर टर्मिनल’च्या विकासासाठी भारत आणि जपानबरोबरील कराराचा शब्द पाळला नसला, तरी अदानी समूहाबरोबरील नव्या करारामुळे भारतातील कंपनीचे अस्तित्व पुन्हा एकदा श्रीलंकेमध्ये असणार आहे. हा करार म्हणजे भारताने चीनला दिलेला शह मानला जात आहे.

परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून, त्याआधीच पश्चिम कंटेनरच्या कराराची घोषणा झाली आहे. या ठिकाणी विविध प्रकल्पांना चीनकडून निधी मिळाला आहे. चीनचे हितसंबंध श्रीलंकेत गुंतलेले असल्याने भारतासाठी ‘पश्चिम कंटेनर’साठीचा करार महत्त्वाचा आहे. ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’साठी अदानी समूहाला ८५ टक्के, तर ईस्ट कंटेनर टर्मिनलसाठी भारत आणि जपानला मिळून ४९ टक्के गुंतवणूक करता येणार आहे. ‘डब्ल्यूसीटी’ भारताच्या दृष्टीने फायद्याचे आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर
श्रीलंकेतील व्यापारी संघटनांनी या कराराला विरोध केला आहे. प्रकल्प कुठल्याही परदेशी कंपनीला देता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, ज्या तऱ्हेने श्रीलंका चीनच्या प्रकल्पांना मंजुरी देते, तशीच मंजुरी भारताच्या प्रकल्पांना मिळावी, अशी भारताची भूमिका आहे.

ब्रिटनमध्ये इंधन संकट; अखेर लष्करामार्फत होणार इंधन वितरण
भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचेल, अशा रीतीने कुठलेही बंदर इतर देशांना लष्करी वापरासाठी देता येणार नाही, असे भारत-श्रीलंका १९८७च्या सुरक्षा करारांत म्हटले आहे. या कराराचे तंतोतंत पालन श्रीलंकेने करावे, असे भारताला वाटते.

India China: चिनी सैनी उत्तराखंडात घुसले… पूल उद्ध्वस्त केला आणि निघून गेले!
परराष्ट्र सचिव श्रीलंका दौऱ्यावर

शृंगला चार दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यास ते प्राधान्य देतील. जाफना, त्रिंकोमली आणि कँडी या ठिकाणी ते भेटी देतील. द्वीपक्षीय संबंध, दोन्ही देशांत झालेले करार, कोव्हिडविरोधी लढ्यातील साह्य आदी बाबींवर उभय देशांतील प्रतिनिधींमध्ये चर्चा होईल. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचीही शृंगला भेट घेतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: