हेल्थ इन्शुरन्स घेताय; ‘या’ पाच गोष्टी ठेवा लक्षात आणि मग करा योजनेची निवड


हायलाइट्स:

  • आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
  • विमा खरेदी करण्याचा विचार करताना सर्वप्रथम तुमची गरज काय आहे, ते ओळखा.
  • वैद्यकीय विम्याचे कव्हरेज मासिक वेतनाच्या ६ पट असावे.

मुंबई : आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वैद्यकीय विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बाजारात वेगवेगळ्या वैद्यकीय विमा पॉलिसी आहेत, ज्या विद्यार्थी, लग्न झालेल्या तरुण-तरुणी, कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, हृदयरोग रुग्ण, जुने आजार असलेल्या लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

स्वस्तात घर खरेदीचा संधी ; बँंक ऑफ बडोदाची आॅफर, जाणून घ्या कधी होणार लिलाव
अशा परिस्थितीत, आरोग्य विमा खरेदी करण्याचा विचार करताना सर्वप्रथम तुमची गरज काय आहे, ते ओळखा. परदेशात उपचारांपासून ते बाळाचा जन्म आणि जुने आजार यांपैकी काहीही असू शकते. हे खात्री केल्यानंतर योग्य कव्हरेज निवडा. विमा क्षेत्रातील तज्ज्ञ अशी शिफारस करतात की, वैद्यकीय विम्याचे कव्हरेज मासिक वेतनाच्या ६ पट असावे. जर तुमचा पगार ५० हजार असेल, तर किमान ३ लाख मेडिकल कव्हरेज असणे आवश्यक आहे.

भारतीयांना मिळणार हायस्पीड इंटरनेट; जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक सुरू करणार ब्रॉडबँड सेवा
फक्त कॅशलेस पॉलिसी खरेदी करा
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅशलेस सुविधा. जर कोणतीही विमा पॉलिसी तुम्हाला कॅशलेस सुविधा देत नसेल, तर अशी पॉलिसी खरेदी करू नका. वैद्यकीय विमा फक्त आणीबाणीच्या परिस्थितीसाठी घेतला जातो. कॅशलेस सुविधेअंतर्गत पॉलिसीधारकाला हॉस्पिटलचे बिल भरावे लागत नाही. यासाठी तो थेट विमा कंपनीशी संपर्क साधतो.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा उडाला भडका
चांगल्या रुग्णालयात कॅशलेस सुविधेचा लाभ
येथे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक विमा पॉलिसी आणि विमा कंपनीसाठी कॅशलेस हॉस्पिटलची यादी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या शहरात राहता, त्या शहराच्या कॅशलेस हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्कीच दाखल व्हा. यादीत किती कॅशलेस रुग्णालये आहेत, यापेक्षा मोठी आणि चांगली सेवा देणारी रुग्णालये त्या यादीत आहेत की नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे.

खोली भाड्यावर विशेष लक्ष द्या
खोलीचे भाडे प्रत्येक विमा पॉलिसीसह मर्यादित आहे. अशा परिस्थितीत, त्याबद्दल आवश्यक माहिती गोळा करा आणि जेव्हा पॉलिसी तुमच्या गरजेनुसार योग्य वाटते, तेव्हाच खरेदी करा. याशिवाय हॉस्पिटलचा खर्चाच्या किती कव्हरेज उपलब्ध आहे, डे-केअर उपचार सुविधा कशी मिळते, खोली भाडे, उप-मर्यादा (सब लिमिट) या पर्यायांचा विचार केल्यानंतरच पॉलिसी खरेदी करा.

एनसीबी (NCB)च्या मदतीने वाढवा विमा रक्कम
या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला तुमच्यासाठी जास्तीत जास्त विमा रक्कम आणि किमान प्रीमियम जमा करायचा आहे. विमा रक्कम वाढवण्याचा एक मार्ग आहे, ज्याला एनसीबी (NCB – नो क्लेम बोनस) म्हणतात. जर पॉलिसीधारक कोणत्याही वर्षात कोणताही दावा करत नसेल, तर विमा कंपनी त्या पॉलिसीसाठी विम्याची रक्कम वाढवते, पण प्रीमियम तसाच राहतो. विमा रकमेची ही रक्कम ५ ते ५० टक्क्यांनी वाढवता येते. वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे स्वतःचे नियम असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: