shahrukh khan son aryan khan detained : क्रूझवर रेव्ह पार्टी; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांची NCB कडून चौकशी


मुंबई/ नवी दिल्लीः नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने शनिवारी रात्री उशिरा मुंबईच्या समुद्रात क्रूझवर छापा टाकला आणि ड्रग पार्टी करणार्‍या ८ जणांना ताब्यात घेतलं. या ८ जणांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही ( shahrukh khan son aryan khan detained ) समावेश आहे. सर्वांची एनसीबी कार्यालयात चौकशी केली जात आहे.

कोणा-कोणाची नावं समोर आली?

एनसीबीने ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्या इतरांची नावंही समोर आली आहेत. मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांचा यात समावेश आहे. एमडीएमए, एक्स्टेसी, कोकेन, एमडी (मेफेड्रोन) आणि चरस यासारखी अंमली पदार्थ शनिवारी संध्याकाळी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली. एनसीबीने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर टाकलेल्या छाप्यात ८ जणांना अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी आणखी काही छापे टाकले जातील. या कारवाईथ एमएमडी, चरस ही अंमली पदार्थ जप्त केली आहेत, असं NCB चे प्रमुख एस. एन. प्रधान म्हणाले.

या प्रकरणी कारवाईत कुठलाही पक्षपात केला जाणार नाही. या प्रकरणात बॉलिवडूच्या काही दिग्गजांचा संबंध समोर आला आहे. यामुळे कायद्यानुसार जी काही कारवाई आहे, ती केली जाईल, अशी माहिती एनसीबीचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी दिली.

अंमली पदार्थ प्रकरणी मुंबईत आमची सतत कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत आम्ही ३०० हून अधिक छापे टाकले आहेत. ही कारवाई सुरूच राहील. मग त्यात विदेश नागरिक असो किंवा बॉलिवूडमधील दिग्गज, कारवाई होणारच, असं एनसीबीचे प्रमुख प्रधान म्हणाले.

मुंबई-गोवा क्रुझवरील पार्टीमध्ये प्रवेशासाठी होता हा ‘कोडवर्ड’, NCB चा मोठा खुलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात शनिवारी मुंबईच्या समुद्रात गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया या क्रूज जहाजावर छापा मारण्यात आला. यावेळी पार्टी करत असलेल्या काही प्रवाशांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आली. या छाप्यात संशयितांची तपासणी केली गेली. त्यांच्याकडून वेगवेगळी अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी आपले कपडे, अंडरवेअरमध्ये आणि महिलांनी पर्समध्ये अंमली पदार्थ लपवले होते, असं एनसीबीने सांगितलं आहे.

मुंबईच्या समुद्रात क्रूझमधील ड्रग पार्टीवर एनसीबीचा छापा; अभिनेत्याच्या मुलासह १० जण

कूझवर रेव्ह पार्टी; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांची NCB कडून चौकशीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: