रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांचा आवाका केला कमी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं हे कारण…


हायलाइट्स:

  • रस्ते प्रकल्पांचे आकार (बंडल साइज) कमी केले आहेत.
  • प्रकल्पांचा आकार ५००० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

पुणे : परदेशी पेन्शन आणि विमा कंपन्यांद्वारे देशातील रस्ते मालमत्ता खरेदी करण्याचा अंदाज बांधून सरकारने मुद्रीकरण योजनेअंतर्गत (Monetization Plan) रस्ते प्रकल्पांचे आकार (बंडल साइज) कमी केले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (२ ऑक्टोबर) दिली. परदेशी फंडांकडे प्रचंड भांडवल आहे, जे इतर बाजारात खूप कमी परतावा देते, त्यामुळे ते भारतात पैसे गुंतवतात, ही गोष्ट गडकरींनी यावेळी सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.

भारतीयांना मिळणार हायस्पीड इंटरनेट; जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक सुरू करणार ब्रॉडबँड सेवा
एका मराठी दैनिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “परदेशी लोकांनी आमच्या मालमत्तेचे मालक व्हावे, अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही प्रकल्पांचा आकार ५००० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांवर आणला आहे. यामुळे देशभरातील गुंतवणूकदार या प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकतील.”

भारतीयांना मिळणार हायस्पीड इंटरनेट; जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक सुरू करणार ब्रॉडबँड सेवा
२०२३ पर्यंत जोजिला बोगदा पूर्ण करण्याच्या सूचना
काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणाऱ्या जोजिला बोगद्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करून नुकतेच परतलेले गडकरी म्हणाले की, कंत्राटदाराला २०२६ ऐवजी २०२३ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. हे इतर कोणत्याही कारणासाठी नाही, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले गेले आहे. या दरम्यान त्यांनी सहकारी क्षेत्राला कार्यक्षमता आणि नफ्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. संबंधित कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

सरकारी तिजोरीला अच्छे दिन! सप्टेंबरमध्ये ‘जीएसटी’मधून मिळाले इतके लाख कोटी
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्रात भूसंपादन दर वाढवल्यामुळे भूसंपादन करण्यात अडचण येत आहे. तो कमी करण्याबाबतची विनंती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: