फिलिपिन्सचे अध्यक्ष ड्युटेर्टे राजकारणातून निवृत्ती घेणार


मनिला : फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटेर्टे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे संभाव्य कायदेशीर लढ्यातून ड्युटेर्टे यांनी स्वत:ची मुक्तता करून घेतल्याचे मानले जात आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ड्युटेर्टे कायम चर्चेत असतात.

ड्युटेर्टे यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला होता. ‘अनेक नागरिकांचा मी उपाध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास विरोध असल्याचे विविध पाहण्यांतून दिसले आहे आणि अनेक व्यासपीठांवरही अशा प्रकारचा कल दिसला आहे,’ असे ड्युटेर्टे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्रीलंकेतील बंदराचे कंत्राट अदानींना; भारताचा चीनला शह, अशी केली कुरघोडी

ब्रिटनमध्ये इंधन संकट; अखेर लष्करामार्फत होणार इंधन वितरण
ड्युटेर्टे ७६ वर्षांचे आहेत. अमली पदार्थांविरोधी कठोर कारवाई, फटकळपणा आणि चौकटीबाहेरची राजकीय शैली यासाठी ते ओळखले जातात. ड्युटेर्टे हे २०१६ पासून राष्ट्रपतीपदावर आहेत. ड्युटेर्टे यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांची कन्या सारा अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ड्युटेर्टे यांच्याविरोधात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोर्टात सुरू असलेल्या कारवाईतून सारा त्यांना वाचवेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ड्युटेर्टे यांनी अमली पदार्थाविरोधात सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले असल्याचे म्हटले जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: