mamata banerjee : अखेर ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली; भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली


कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची ( bhabanipur assembly bypolls ) खुर्ची राखली आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा पराभव केला. टिबरेवाल यांचा पराभव निश्चित मानला जात होता. कारण भवानीपूर हा ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. यापूर्वीही त्या इथून निवडणूक जिंकल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. पण निवडणकीत तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळवल्याने त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार होणं गरजेचं होतं. अखेर विधानसभा पोटनिवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत.

piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’

ममता बॅनर्जींविरोधात भाजपच्या प्रियांका टिबरेवाल या निवडणुकीच्या मैदानात होत्या. या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी टिबरेवाल यांचा ५८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ममता बॅनर्जी यांनी ५८ हजार ८३२ मतांनी जिंकल्या. ममतांच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

navjot singh sidhu : ‘संपूर्ण काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धूंच्या कॉमेडीत रंगलीय’

ममता बॅनर्जी म्हणाल्या…

मी भवानीपूरच्या जनतेचे आभार मानते. मला १ लाख १५ हजार मते मिळाली. भवानीपूरच्या कोणत्याही प्रभागात माझा पराभव झालेला नाही. भवानीपूरमध्ये ४६ टक्के बिगर बंगाली आहेत आणि प्रत्येकाने आम्हाला मतदान केले, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भवानीपूरमधील विजयानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षाविरोधात कट रचण्यात आला. विधानसभा निवडणुकीवेळी माझ्या पायाला दुखापत झाली होती. पण जनतेने तृणमूल काँग्रेसला विजयी करत पाठिंबा दिला.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: