संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी हणमंत शिंदे यांची बिनविरोध निवड

संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी हणमंत शिंदे यांची बिनविरोध निवड Unopposed election of Hanmant Shinde as President of Sant Ravidas Charmakar Youth Foundation West Maharashtra

पुणे - संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन, कार्यक्षेत्र संपूर्ण भारत या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपदी हणमंत शिवाजी शिंदे यांची निवड झाली आहे . 

    संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता आत्माराम कदम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानदेव कदम, महाराष्ट्र सचिव देवाप्पा भाऊ शिंदे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश शिंदे व पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील रोकडे राष्ट्रीय महासचिव नरेंद्र वाडेकर,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संजय ननावरे,महाराष्ट्र राज्य प्रवक्ते गोविंद भैया पोटफोडे,महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच उद्योजक अध्यक्ष पांडुरंग बामणे,महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा सुप्रिया आंबेतकर यांच्या अध्यक्षेखाली नियुक्ती पार पडली.तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक सचिव सुजय जाधव,पश्चिम महाराष्ट्र सहसचिव सुनील रोकडे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश शिवदास,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सूर्यकांत खाडे,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजय शिंदे,सांगली जिल्हा अध्यक्ष निशांत बुरुटे,
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नारायण अगवणे,
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन धुमाळ,
सांगली जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा शिंदे. यांच्यासमवेत बिनविरोध निवड झाली. 

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता आत्माराम कदम म्हणाले, हणमंत शिवाजी शिंदे पश्चिम महाराष्ट्राला चर्मकार समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन चेहरा मिळाला आहे. 

    हणमंत शिवाजी शिंदे म्हणाले, चर्मकार समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. महिलांवर होणारे अत्याचार,वृद्ध अपंग विधवा यांच्या येणाऱ्या पेन्शन योजना तसेच समाजकल्याण कडून येणार्या योजनांचा प्रामाणिकपणे व निस्वार्थ मानाने प्रत्येक चर्मकार समाज बंधू भगिनींना मी लाभ मिळवून देणार आहे. समाजकल्याणकडे समाजासाठी ज्या काही  योजना आहेत त्या समाजासाठी आणण्याचा मी प्रयत्न करेन. गटई कामगार यांच्यासाठी प्रति महिना दोन हजार रुपये मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला दिलेली संधी समस्त चर्मकार संघटनेने टाकलेला विश्वास आहे. त्यामुळे मी प्रामाणिक आणि निस्वार्थ मनाने मी काम करेन असेही ते म्हणाले. 

यावेळी निवडीचे पत्र कोल्हापूर ,सांगली,पुणे, सातारा येथील सर्व अध्यक्ष व महिला अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: