पहिल्या ५० धावा ४३ चेंडूत, नंतर १७ चेंडूत केल्या ५१ धावा; चाहते म्हणाले विराटचा…


दुबई: चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या लढतीत नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकार मारले. आयपीएलमधील त्याचे हे पहिले शतक ठरले. इतक नव्हे तर या हंगामात त्याच्या ५०८ धावा झाल्या आहेत. आयपीएलच्या १४व्या हंगामता ५०० धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

वाचा- शतकानंतर पुण्याच्या ऋतुराजने सर्वांचे मन जिंकले; म्हणाला, टीम आधी मग…

ऋतुराजने १८व्या षटकात ५७ चेंडूत ९३ धावा केल्या होत्या. तेव्हा असे वाटत होते की, तो १९व्या षटकात शतक पूर्ण करेल. पण रविंद्र जडेजा एका पाठोपाठ एक शॉट मारत होता. त्यामुळे अखेरचा चेंडू ऋतुराजला भेटला. त्यावर त्याने दोन धावा केल्या. त्यामुळे स्ट्राइक जडेजाकडे गेला.

वाचा- IPL Playoff Race: IPLच्या इतिहासातील सर्वात अवघड प्ले ऑफची रेस; ४ संघात महामुकाबला

शेवटच्या षटकात जडेजाने मुस्तफिजुर रहमानला पहिल्या ३ चेंडूवर मोठे शॉट मारले. चौथ्या चेंडूवर एक धाव मिळाली. शतक पूर्ण करण्यासाठी ऋतुराजकडे दोन चेंडू होते. पाचव्या चेंडूवर धाव निघाली नाही. अखेरच्या चेंडूवर त्याला ५ धावा हव्या होत्या. त्याने ही संधी सोडली नाही. ऋतुराजने १०८ मीटर लांब षटकार मारला आणि शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने १०३ मीटर लांब षटकार मारला होता. अखेरच्या चेंडूवर शॉट मारल्यानंतर ऋतुराजने जल्लोष केला. कारण त्याला माहिती होते की चेंडू सीमा रेषेच्या फार दूर गेला आहे.

या सामन्यात गायकवाडने जडेजा सोबत पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूत नाबाद ५५ धावांची भागिदारी केली. ऋतुराजने या हंगामातील १२ लढतीत ५०.८०च्या सरासरीने ५०८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेड १४० इतका आहे. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या हंगामातील ६ सामन्या त्याने ५१.०८च्या सरासरीने २०४ धावा केल्या होत्या.

चाहते म्हणाले नवा विराट कोहली सापडलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: