DVP मल्टिप्लेक्समध्ये परिचारीकेच्या हस्ते DVP कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न

DVP मल्टिप्लेक्समध्ये परिचारीकेच्या हस्ते DVP कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न Nurses inaugurate DVP covid Hospital at DVP Multiplex
    पंढरपूर, 03/05/2021- देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला असताना दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यासह प्रामुख्याने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडत असताना रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत आहे.अनेक रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णासाठी सांगली,सातारा,उस्मानाबाद,पुणे आदी जिल्ह्यात बेडची शोधाशोध करीत असल्याचे दुर्देवी चित्र दिसत आहे.अशावेळी कोरोना बाधीत आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा देण्यासाठी डिव्हीपी उद्योग समुहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेत पंढरपूरातील DVP मल्टिप्लेक्स येथे डि.व्ही.पी.कोविड हॉस्पिटलची उभारणी केली असून आज पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गिराम, आरोग्य अधिकारी डाॅ.एकनाथ बोधले यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांची सेवा करणार्‍या परिचारीकांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

    येथील सुविधाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की या सेंटर मध्ये जवळपास 30 ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे तर 20 विलगीकरण बेडची सोय आहे. या ठिकाणी सेंटरमध्ये MD,MBBS, BAMS डाॅक्टर्स, नर्स, सिस्टर, मेडिकल,लॅब असून 24 तास रूग्णांची सेवा देण्यासाठी हे आज पासून रुग्णसेवेत दाखल झाले आहे. पंढरपूरात दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेने राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.पंढरपूर शहरात काही प्रमुख हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.मात्र रुग्णांच्या संख्येच्या मानाने बेड उपलब्ध नसल्याने DVP समुहाच्या माध्यमातून आम्ही रुग्णसेवेत आपला खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. 

         यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अभिजीत पाटील यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच स्टाफला गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,डाॅ.श्रीराज काणे,डाॅ.प्रशांत निकम,डाॅ.पाचकवडे, संचालक संतोष कांबळे, विश्वंभर पाटील,नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, महादेव तळेकर तसेच आरोग्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: