लस एक वैद्यकीय संजीवनी – डॉ नीलमताई गोऱ्हे

चाकण औद्योगिक क्षेत्रात आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे स्त्री आधार केंद्राच्या वतीने मोफत लसीकरण
  पुणे,०३ सप्टेंबर २०२१ : देशात लसीकरणात महिलांची संख्या कमी आहे.ती संख्या वाढावी यासाठी महिलांना लस देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, स्त्री आधार केंद्रच्यावतीने महाराष्ट्रा तील कामगार महिलांचे मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लस एक संजीवनी असून एक प्रकारे वैद्यकीय प्रसाद तुम्ही घेत आहात. लस घेणे आणि देणे एवढा स्त्री आधार केंद्र आणि तुमचा संबंध नसून भविष्यात अनेक ठिकाणी महिलांच्या हक्कासाठी उभी राहणारी ही संस्था आहे . तसेच येत्या काही दिवसांनी महिलांसाठी आरोग्य शिबीर देखील आयोजित करू असा विश्वास डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिला. 

       राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सीएसआर निधीच्या माध्यमातून स्त्री आधार केंद्र,पुणे यांनी हाती घेतले आहे. त्याच अनुषंगाने चाकण ता.खेड जि.पुणे येथील औद्योगिक क्षेत्रात आणि असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी असलेली कोव्हीशिल्ड लस मोफत देण्याचा मोहिमेचा उद्घाटन समारंभ आज रविवारी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी,अपर्णा पाठक, डॉ.दीपक कोठारी,अनिता शिंदे,आश्लेषा खंडागळे,शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे,नितीन शेठ गोरे, माजी नगराध्यक्ष राजू शेठ गोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, रामदास धनवटे,रामदास जाधव आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र खेबुडकर यांनी केला.आभार गोरे यांनी मानले. 

    यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चाकण परिसरात वाचनालय व महिलांसाठी मोफत अभ्यासिका करावी असा प्रस्ताव यावेळी व्यक्त केला व या वाचनालयासाठी १० लाखाचा निधी देण्याचे आश्वासित केले. वाचनालय व अभ्यासिकेच्या जागा उपलब्धते करिता चाकण नगरपरिषदेची देखील मदत आपल्याला लागेल असे ही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या उपरांत नीलमताई गोऱ्हे यांनी गोरे कुटुंबीयांची भेट घेतली.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: