Video: चेंडूच्या मागे फिल्डर नव्हे तर फलंदाज पळत गेला; पाहा IPL मध्ये काय झाले


नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या ४७व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा सात विकेटनी पराभव केला. या विजयामुळे प्लेऑफमध्ये पोहोचायच्या राजस्थानच्या आशा कायम आहेत. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १८९ धावा केल्या.

वाचा- शतकानंतर पुण्याच्या ऋतुराजने सर्वांचे मन जिंकले; म्हणाला, टीम आधी मग…

उत्तरादाखल यशस्वी जयसवालने स्फोटक सुरूवात करून दिली. त्याने २१ चेंडू ५० धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने नाबाद ६४ धावा करून संघाला १८व्या षटकात विजय मिळवून दिला. या सामन्यात राजस्थानकडून न्यूझीलंडचा विकेटकीपर ग्लेन फिलिप्सने आयपीएलमध्ये पदार्पण केले.

फिलिप्सने ८ चेंडूत १ चौकार आणि एक षटकारासह नाबाद १४ धावा केल्या. तो फलंदाजीला आल्यावर एक अशी घटना झाली जी पाहिल्यानंतर सर्वांना हसू आवरता आले नाही.

वाचा- IPL Playoff Race: IPLच्या इतिहासातील सर्वात अवघड प्ले ऑफची रेस; ४ संघात

राजस्थानच्या डावातील १७व्या षटकात चेन्नईकडून सॅम करनने गोलंदाजी केली. या षटकातील दुसरा चेंडू टाकताना सॅमच्या हातातून सुटला आणि तो फिलिप्सच्या डाव्या बाजूला फार वरच्या बाजूने विकेटकीपरच्या दिशेला गेला. चेंडू इतक्या लांब गेल्यानंतर देखील फिलिप्सने तो सोडला नाही. तो विकेटच्या मागे पळत गेला आणि शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण धोनीने चेंडू पकडला. त्यानंतर फिलिप्स गोलंदाजाकडे पाहून हसू लागला. अंपायरने नो बॉल दिला. हा चेंडू पाहून समालोचकांना देखील हसू आवरता आले नाही.

वाचा- पहिल्या ५० धावा ४३ चेंडूत, नंतर १७ चेंडूत केल्या ५१ धावा; चाहते म्हणाले विराटचा…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: