धोनी आहे किंग काँग; असं का म्हणाले रवी शास्त्री?


नवी दिल्ली : जर कर्णधारपद ही एक कला आहे, तर एमएस धोनी हा ज्येष्ठ कलाकार आहे, ज्याने क्रिकेटच्या पांढऱ्या चेंडूच्या स्वरुपात खरोखर एक स्टँडर्ड (उच्च मानक) निश्चित केला आहे. क्रिकेटचा इतिहास भारताच्या या माजी कर्णधाराच्या प्रतिभेचं कौतुक करणाऱ्या कथांनी भरलेला आहे. धोनीला ज्यांनी जवळून पाहिलं आहे, ते म्हणतात की नेतृत्वाच्या बाबतीत धोनीपेक्षा चांगला माणूस नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही त्यांपैकी एक आहेत. शास्त्रींचा असा विश्वास आहे की, क्रिकेटच्या पांढऱ्या चेंडूच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनी हा आतापर्यंतचा सर्वात महान कर्णधार आहे.

वाचा-पहिल्या ५० धावा ४३ चेंडूत, नंतर १७ चेंडूत केल्या ५१ धावा; चाहते म्हणाले विराटचा…

रवी शास्त्रींनी फॅन कोडशी बोलताना सांगितले की, मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये एक कर्णधार जे काही मिळवू शकतो, ते जवळपास सर्व काही त्याने साध्य केले आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या नोंदी स्वतःच सगळं काही सांगतात. पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात धोनी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे. आयसीसीच्या स्पर्धांमधील त्याचे विक्रम पाहा. तो काय जिंकला नाही? आयपीएल, चॅम्पियन्स लीग, आयसीसीच्या स्पर्धा, दोन विश्वचषक. जेव्हा व्हाईट बॉल क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा त्याच्या जवळपासही कुणी दिसत नाही. तो महान आहे. द किंग काँग. तुम्ही त्याला असं म्हणू शकता.

वाचा- IPL Playoff Race: IPLच्या इतिहासातील सर्वात अवघड प्ले ऑफची रेस; ४ संघात महामुकाबला

प्रशिक्षक रवी शास्त्री पुढे म्हणाले की, ”धोनीचा शांत स्वभाव आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची कला त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. जेव्हा तुम्ही धोनीला भारतीय संघाचे आणि आता चेन्नई सुपर किंग्ज (CSK)मध्ये नेतृत्व करताना पाहता तेव्हा गोष्टी नियंत्रणात असल्याची खात्री आणि मनाला शांती असते.”

वाचा- शतकानंतर पुण्याच्या ऋतुराजने सर्वांचे मन जिंकले; म्हणाला, टीम आधी मग…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवत आहे. आयपीएलच्या या मोसमात सीएसकेचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई हा पहिला संघ बनला आहे, जो या हंगामात प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: