Aryan Khan Arrest Update: आर्यनच्या अटकेनंतर सलमान शाहरुखच्या भेटीला; नेमकी कोणती चर्चा झाली?


हायलाइट्स:

  • सलमान पोहचला शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर.
  • माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
  • आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखची घेतली भेट.

मुंबई: मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आजची रात्र एनसीबी कोठडीत काढावी लागणार आहे. किला कोर्टाने त्याला एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ड्रग्ज पार्टीवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच शाहरुखचा बंगला मन्नत येथील घडामोडींनी लक्ष वेधले असून अभिनेता सलमान खान रविवारी रात्री उशिरा मन्नतवर दाखल झाला. यावेळी मन्नत बाहेर माध्यम प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. मात्र, सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ( Salman Khan Meets Shah Rukh Khan )

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या एनसीबी कोठडीत असून शाहरुख व कुटुंबीयांसाठी हा सर्वात कठीण काळ मानला जात आहे. मुलावरील कारवाईनंतर शाहरुखने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याच्यावरील तणाव स्पष्टपणे दिसत आहे. आर्यनची बाजू मांडण्याची जबाबदारी त्याने ज्येष्ठ वकील सतीष मानेशिंदे यांच्याकडे सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीष मानेशिंदे यांच्यासह शाहरुखचे दोन मॅनेजरही एनसीबी कार्यालयात रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. आर्यनला किला कोर्टाने एका दिवसाची कोठडी सुनावली असून त्याच्या जामिनासाठी लगेचच अर्जही करण्यात आला आहे. सोमवारी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एनसीबीकडून न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाईल हे स्पष्ट झाले असून आर्यनला दिलासा मिळणार की नाही हे कोर्टातील सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे.

वाचा: ड्रग्ज पार्टी: आणखी पाच जणांना अटक; आर्यनची जामिनासाठी धडपड

आर्यनवरील कारवाई रविवारी दिवसभर चर्चेत असताना व त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच रात्री उशिरा सलमान खान वांद्रे पश्चिम येथील शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहचला. रेंज रोव्हर गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर सलमान बसला होता. मन्नतजवळ येताच सलमानचा गाडीला माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला. मात्र, सुरक्षारक्षकांनी वाट मोकळी करून दिली व सलमान कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे गेला.

दरम्यान, शाहरुख आणि सलमान यांची मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांत एकत्र भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्यांमध्ये कौटुंबिक संबंधही जिव्हाळ्याचे राहिले आहेत. त्यातूनच शाहरुखच्या मुलावर कारवाई झाल्यानंतर सलमान तातडीने शाहरुखच्या घरी पोहचल्याचे बोलले जात आहे. या भेटीचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

वाचा: आर्यनकडे ड्रग्जचा साठा व मोठी रोकड; अ‍ॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: