Building Collapsed in Kalbadevi : मुंबईच्या काळबादेवी परीसरात ४ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू


हायलाइट्स:

  • मुंबईच्या काळबादेवी परीसरात ४ मजली इमारत कोसळली
  • एका व्यक्तिचा मृत्यू
  • तब्बल शंभर लोकांना बिल्डिंगमधून बाहेर काढलं

मुंबई : मुंबई येथे आणखी एक इमारत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील काळबादेवी परिसरात इमारत कोसळून ६१ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला. काल रात्री ही घटना घडली. संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बचाव पक्ष आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीनीच्या तिसऱ्या मजल्यावर शौचालयाचं प्लास्टर आणि चौथ्या मजल्यावरच्या इमारतीचा भाग कोसळला आहे. इतकंच नाहीतर काही भाग लटकललेला दिसत आहे. त्यामुळे या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इमारतीच्या अनेक भागांमध्ये भेगा पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने ही इमारत रिकामी केली आणि इमारतीच्या आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तब्बल शंभर लोकांना बिल्डिंगमधून बाहेर काढण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या इमारतीची संपूर्ण माहिती गोळा करून नेमका हा अपघात कसा झाला याबद्दल चौकशी करण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: