इंधन महागाईचे चटके ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव


हायलाइट्स:

  • कंपन्यांनी सलग सलग चार दिवस इंधन दरवाढ केली होती.
  • आज पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले.
  • मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे.

मुंबई : सलग चार दिवस इंधन दरवाढ केल्यानंतर आज सोमवारी कंपन्यांनी दरवाढीला तूर्त ब्रेक लावला. आज पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर स्थिर आहेत. मात्र आठ दिवसांत झालेल्या दरवाढीने नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कच्च्या तेलातील महागाईने नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती. मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे.

डीमार्टच्या महसुलात वाढ; दुसऱ्या तिमाहीत अव्हेन्यू सुपरमार्टची कामगिरी उंचावली
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.९५ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.९५ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.५८ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.४७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.३७ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.४४ रुपये झाले आहे.

बिटकॉइन ४८ हजार डॉलरवर ; जाणून घ्या आज कोणत्या क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली वाढ
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.८४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९०.१७ रुपये आहे. चेन्नईत ९४.७४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.२७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९९.०९ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.७० रुपये आहे.

शेअर बाजारात पडझड; रिलायन्स वगळता ‘या’ कंपन्यांच्या बाजार भांडवलात झाली प्रचंड घट
जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.३० डाॅलरने कमी होऊन ७८.९८ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव मात्र ०.३३ डाॅलरने घसरला आणि तो ७५.५५ डाॅलर प्रती बॅरल झाला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: