IPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार


नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील प्ले ऑफमधील ३ संघ जाहीर झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. आता चौथ्या आणि एकमेव जागेसाठी तीन संघांत स्पर्धा आहे. पंजाबचा ६ धावांनी पराभव झाल्याने त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळ जवळ संपुष्टात आल्या आहेत. तरी देखील एक छोटीशी आशा शिल्लक आहे, जाणून घेऊयात प्ले ऑफचे संपूर्ण गणित…

वाचा- Video: चेंडूच्या मागे फिल्डर नव्हे तर फलंदाज पळत गेला; पाहा IPL मध्ये काय झाले

चेन्नई, दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यानंतर आता आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणता संघ पोहोचणार याची उत्सुकता लागली आहे. गुणतक्त्यात चेन्नई अव्वल स्थानी, दिल्ली दुसऱ्या तर बेंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात स्पर्धा आहे. यातील पंजाब किंग्जला फार कमी संधी आहे. कारण त्यांची एकच मॅच शिल्लक असून त्यात विजय मिळवल्यास त्याचे १२ गुण होतील जे पुरेसे ठरणार नाहीत. जर ३ संघांनी पुढील सामन्यात फक्त एक विजय मिळवला तर पंजाबला संधी आहे. पण त्या परिस्थितीत नेट रनरेट महत्त्वाचे ठरेल.

वाचा- कर्णधाराला वाचवण्यासाठी IPLमधील संघ हा प्रकार करतात; गौतम गंभीरने केला मोठा आरोप

गुणतक्त्यात कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्याची एक लढत शिल्लक आहे. या लढतीत त्यांनी विजय मिळवल्यास केकेआरचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी १० गुण असून १४ गुण होण्यासाठी पुढील दोन्ही लढतीत विजय मिळवावा लागले. अशा परिस्थितीत या तिनही संघांचे १४ गुण होतील आणि प्ले ऑफमधील चौथा संघ नेट रनरेटच्या आधारावर ठरले.

जर केकेआरने शिल्लक एकमेव लढत गमावली आणि मुंबई व राजस्थानने दोन पैकी एक लढत जिंकली तर या सर्व संघांचे १२ गुण होतील. या परिस्थितीत देखील नेट रनरेट महत्त्वाचे ठरले. ही परिस्थिती पंजाब किंग्जसाठी प्ले ऑफचा दरवाजा उघडू शकते. पंजाबचे शिल्लक लढतीत चेन्नईविरुद्ध चांगल्या रनरेटने विजय मिळवल्यास त्यांचे १२ गुण होतील आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळू शकते. पण यामध्ये अन्य ३ संघांपेक्षा नेट रनरेट चांगले हवे. पंजाबची चेन्नईविरुद्धची लढत ७ ऑक्टोबर रोजी आहे. तर हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील लढत ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामुळे प्लेऑफमधील अखेरची संघ साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी निश्चित होण्याची अधिक शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: