Lakhimpur Kheri violence: पोलिसांनी रस्त्यावर उभा केला ट्रक, अखिलेश यादवांना लखीमपूरला जाण्यापासून रोखलं


हायलाइट्स:

  • लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसहीत आठ जणांचा मृत्यू
  • उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं
  • विरोधी नेत्यांना लखीमपूरला जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून हरएक प्रयत्न

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील हिंसाचार चार शेतकऱ्यांसहीत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापलंय. विरोधी पक्षांनीही या प्रकरणात उडी घेतलीय. अनेक पक्षांचे नेते आज लखीमपूरकडे रवाना झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेदेखील आज लखीमपूर खीरीकडे रवाना होण्यासाठी लखनऊ स्थित आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. मात्र, इथेच पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान, पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय.

या अगोदर, लखीमपूरला निघालेल्या अखिलेश यादव यांना पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर त्यंनी आपल्या कार्यकर्त्यांसहीत आपल्या घरासमोरच्या रस्त्यावरच ठाण मांडलं. या दरम्यान समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोरदार गोंधळ घालण्यात आला.

अखिलेश यादव यांनी आपला लखीमपूर खीरी दौरा जाहीर केल्यानंतर यांच्या घराबाहेर रात्रीपासूनच मोठ्या संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आलंय. अखिलेश यादव यांचा रस्ता रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरच एक मोठा ट्रक उभा केला होता. सोबतच, बॅरिकेडिंगही उभारण्यात आलं होतं.

​VIDEO: ‘हात तर लावून दाखवा’, लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदा
Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल
lakhimpur kheri : यूपीत लखीमपूर-खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडलं? तणावाचं वातावरण

यापूर्वी, नवी दिल्लीहून निघाल्यानंतर पोलिसांशी लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या प्रियांका गांधी आज पहाटेच लखीमपूरला पोहचल्या. मात्र, हरगावजवळ त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या दरम्यान प्रियांका गांधी यांची पोलिसांशी झटापटही झाली.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे नेते आणि पक्षाचे महासचिव सतीश चंद्र मिश्र यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचं समोर येतंय. ‘बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार एस सी मिश्र यांना रात्री उशिरा लखनऊमध्ये त्यांच्या निवासस्थानी नजरकैद करण्यात आलंय. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधिमंडळ लखीमपूर खीरी जाऊन शेतकरी हत्याकांडाबद्दल अधिक माहिती घेऊ शकले नाहीत. हे अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे’, असं ट्विट मायावती यांनी केलंय.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनाही पोलिसांनी चेकिंग दरम्यान रोखण्यात आलंय.

रविवारी, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. दोषींना अटक करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. या प्रकरणात प्रकरणात पोलिसांनी आशिष मिश्रा याच्यासहीत १५ जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. मात्र अद्याप या घटनेत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

shahrukh khan son aryan khan detained : क्रूझवर रेव्ह पार्टी; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांची NCB कडून चौकशी
piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’
पोलिस निरीक्षकाचा प्रताप! व्यापाऱ्याला मारहाण, तोंडात पिस्तुल घुसवलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: