पँडोरा पेपर: सचिन तेंडुलकरने खरच कर चुकवेगिरी केली का? मास्टर ब्लास्टरने दिले उत्तर


मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव सोमवारी सकाळी अचानक चर्चेत आले. सचिनचे नाव चर्चेत येणे ही गोष्ट नवी नसली तरी यावेळी त्याचे नाव एका चुकीच्या प्रकरणात समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पँडोरा पेपर्स नावाने लीक झालेल्या कागदपत्रात देशाली अनेक बड्या लोकांचे आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहेत. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरसह ३०० जणांची नावे असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वाचा- IPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार

देशातील अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश या पेपर्समध्ये असल्याचे समजते. या नावांमध्ये सर्वात धक्कादायक नाव म्हणजे सचिन तेंडुलकरचे होय. सचिनचे नाव समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला. या प्रकरणी सचिननच्या वकिलांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा- Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण

काय म्हणाले सचिनचे वकील

या गोष्टीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सचिनचे नाव विनाकारण बदनाम केले जात आहे. जगभरात सचिनची प्रतिमा एक स्वच्छ आणि प्रामाणिक क्रिकेटपटू अशी आहे. मैदान आणि मैदानाच्या बाहेर सचिन कोणत्याही वादात नव्हता. क्रिकेटच्या मैदानावर छोटे-मोठे वाद होतच असता. पण क्रिकेटपटू म्हणून सक्रीय असताना तो वादापासून दूर होता. सचिन वादग्रस्त वक्तव्यापासून लांबच राहतो.

वाचा- कर्णधाराला वाचवण्यासाठी IPLमधील संघ हा प्रकार करतात; गौतम गंभीरने केला मोठा आरोप

इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट (ICIJ) या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने गेल्या वर्षभरात विशेष शोध मोहीम राबवली होती. यात जगभरातील अतिश्रीमंतांनी कर प्रणालीतून पळवाट शोधून स्वत:ची संपत्ती सुरक्षित ठिकाणी लपवण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतामधील ज्या लोकांची नावे या पेपर्समध्ये आहेत त्यात सचिनचा समावेश आहे. या पेपर्समध्ये सचिन तेंडुलकरने विदेशात संपत्ती ठेवल्याचा दावा केलाय. पण सचिनच्या वकिलाने हा दावा फेटाळून लावलाय. सचिनची सर्व गुंतवणूक वैध आहे आणि आयकर अधिकाऱ्यांकडे त्याची माहिती आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: