कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराला दररोज 1000 कोरोनाची लस मिळावी- नगराध्यक्षा साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

पंढरपूर, 04/05/2021-पंढरपूर शहरामधील कोरोनाची वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रणात राहण्यासाठी शहराला रोज 1000 कोरोनाची लस मिळावी – नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची मागणी To prevent spread of corona,city should get 1000 corona vaccines daily – Mayor Sadhanatai Bhosale and Chief Officer Aniket Manorkar

सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल) अपुरी पडत असुन त्यांच्यावर खुप ताण पडत आहे.

   पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाख असून शासनाकडून सात दिवसातून फक्त 200 ते 300 कोव्हिड 19 च्या लसीचा पुरवठा नगरपरिषद ला सध्या होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होवून नागरिकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराची 1 लाख लोकसंख्या विचारात घेता दररोज 1000 कोव्हिडची लस नगरपरिषदेला मिळणे अपेक्षित आहे तरी पंढरपूर नगरपरिषदेला दररोज 1000 कोरोनाची लस मिळावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: