Lakhimpur Violence: मुलगा घटनास्थळी नव्हताच, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा दावा


हायलाइट्स:

  • आशिष मिश्रा गाडी चालवत असल्याचा शेतकरी आंदोलकांचा दावा
  • केंद्रीय मंत्र्यांसहीत मुलानंही फेटाळले आरोप
  • लखीमपूर हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणानं देशाला हादरा दिलाय. या घटनेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय. मात्र, आपला मुलगा घटनास्थळी नव्हताच असा दावा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी केलाय. आशिष मिश्रानंही आपल्यावरचे आरोप साफ खोटे असल्याचं म्हटलंय.

रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत, मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत तीन भाजप कार्यकर्त्यांसहीत मिश्रा यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागलेत.

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या काही असामाजिक तत्त्वांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे तीन कार्यकर्ते आणि गाडीचा चालक ठार झाल्याचंही मिश्रा यांनी म्हटलंय. आंदोलकांकडून अगोदर भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे वाहन चालकानं वाहनावरचं आपलं नियंत्रण गमावलं आणि त्यामुळे शेतकरी गाडीखाली चिरडले जाण्याची दुर्घटना घडली, असं स्पष्टीकरणही अजय मिश्रा यांनी दिलंय.

Lakhimpur Kheri violence: ‘मी फक्त मंत्री-खासदार नाही’ म्हणणाऱ्या अजय मिश्र यांची खरी ओळख
Lakhimpur violence: ‘मला सोडा, जाऊ द्या…’, लखीमपूर हिंसाचारात मंत्र्यांच्या ड्रायव्हरचा नाहक बळी?
‘शेतकरी आंदोलनात असामाजिक तत्त्वांची घुसखोरी’

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. ‘काही शेतकरी शांतीपूर्ण पद्धतीनं विरोध प्रदर्शन करत असल्याची सूचना आम्हाला मिळाला होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. याच दरम्यान, शेतकरी आंदोलकांआड लपलेल्या काही ‘असामाजिक तत्त्वांनी’ भाजप कार्यकर्त्यांवर काठ्यांनी हल्ला केला’, असं केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी या घटनेबद्दल बोलताना म्हटलं. ‘बब्बर खालसा’सारख्या कट्टरतावादी संघटनांनी शेतकरी आंदोलनात घुसखोरी केल्याचा दावा मिश्रा यांनी केलाय.

‘…तर आशिष आज जिवंत नसता’

मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, घटना घडली तेव्हा आपला मुलगा आशिष मिश्रा हा घटनास्थळी उपस्थित नव्हताच. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावाही केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. ‘माझा मुलगा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होता. तिथं हजारो लोक, प्रशासन आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते’ असा दावाही मिश्रा यांनी केला आहे.

‘आशिष त्या गाडीत असता तर आज तो जिवंत नसता. आंदोलनकांनी दोन गाड्यांना आग लावली तसंच ड्रायव्हरचीही मारहाण करत हत्या केली. पक्षाचे १० पेक्षा अधिक कार्यकर्ते जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत’, असंही मिश्रा यांनी म्हटलंय.

अजय मिश्रा यांच्यासोबत बनबीरपूरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या जाहीर कार्यक्रमाचा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. याचवेळी एका काळ्या जीपनं काही शेतकऱ्यांना धडक देण्याची घटना घडली. त्यानंतर हिंसाचार उफाळून आला. या घटनेत चार शेतकऱ्यांसहीत भाजपशी संबंधीत चार जणांनी आपले प्राण गमावले. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आशिष मिश्रासहीत पोलिसांनी १४ जणांविरोधात कलम ३०२२, १२० बी आणि इतर कलमांसहीत एफआयआर दाखल केली आहे.

Lakhimpur Kheri violence: पोलिसांनी रस्त्यावर उभा केला ट्रक, अखिलेश यादवांना लखीमपूरला जाण्यापासून रोखलं
​VIDEO: ‘हात तर लावून दाखवा’, लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदा
Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: