ऊर्जा क्षेत्रात अदानींची आगेकूच; तब्बल २६ हजार कोटी मोजून खरेदी केली ‘ही’ कंपनी
हायलाइट्स:
- अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एसबी एनर्जी होल्डिंग्स लिमिटेड (SB Energy India) खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
- ३.५ अब्ज डॉलर म्हणजेच २६,००० कोटी रुपये किंमतीचा हा करार पूर्णपणे रोख स्वरूपात करण्यात आला आहे.
- यासाठी दोन्ही कंपन्यांनी १८ मे २०२१ रोजी करार केला होता.
तेजी परतली; सेन्सेक्सची ६०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांची एक लाख कोटींची कमाई
एसबी एनर्जी इंडिया आता पूर्णपणे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या मालकीची झाली आहे. याआधी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प आणि भारती ग्रुपची अनुक्रमे ८० आणि २० टक्के हिस्सेदारी एसबी एनर्जीमध्ये होती. यापूर्वी, एसबी एनर्जी कॅनेडियन पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (सीपीपीआयबी) शी बोलणी करत होती, पण मूल्यांकनावरील मतभेदांमुळे ते जमू शकले नाही. यानंतर अदानी ग्रीन एनर्जीशी त्यांची चर्चा तीव्र झाली.
सणासुदीची खरेदी; सोनं स्वस्त होणार की महागणार, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
काय होणार फायदा
गेल्या आठवड्यात अदानींनी घोषणा केली होती की, त्यांचा गट पुढील १० वर्षांमध्ये अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. एजीईएलचे एमडी आणि सीईओ विनीत एस जैन म्हणाले, “या करारामुळे आम्ही रिन्यूएबल्स क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या जवळ आलो आहोत. कार्बनमुक्त भविष्यासाठी आपण किती गंभीर आहोत, हे हा करार सिद्ध करतो. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होईल.
पँंडोरा पेपर्सनं उडवली जगभरात खळबळ; करचुकव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीय
या अधिग्रहणामुळे अदानी ग्रीनच्या क्षमतेमध्ये पाच गीगावॅट (5 GW) ची भर पडेल. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सौर, पवन आणि सौर-पवन या हायब्रिड प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी १७०० मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर उर्वरित प्रकल्पांवर काम चालू आहे. यामुळे एजीईएल (AGEL)चे एकूण पोर्टफोलिओ १९.८ गीगावॅट पर्यंत वाढला आहे.