तेजी मंदीचा खेळ; कमॉडीटी बाजारात सोने-चांदीमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव


हायलाइट्स:

  • कमॉडिटी बाजारात सध्या तेजी मंदीचा खेळ सुरु आहे.
  • आज सकारात्मक सुरुवात करणाऱ्या सोने आणि चांदीमध्ये दुपारनंतर नफावसुली.
  • सध्या सोने दरात १२० रुपयांची घसरण झाली आहे.

मुंबई : कमॉडिटी बाजारात सध्या तेजी मंदीचा खेळ सुरु आहे. आज सोमवारी सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात करणाऱ्या सोने आणि चांदीमध्ये दुपारनंतर नफावसुली दिसून आली आहे. सध्या सोने दरात १२० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी २५२ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सणासुदीची खरेदी; सोनं स्वस्त होणार की महागणार, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६४०४ रुपये आहे. त्यात १०२ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६३८० रुपयांपर्यंत घसरला होता. एक किलो चांदीचा भाव ६०२३६ रुपये आहे. त्यात ३१४ रुपयांची घट झाली आहे. आज सकाळी सोने १३० रुपयांनी महागले होते. तर चांदीमध्ये ५५० रुपयांची वाढ झाली होती.

गुंतवणुकीच्या अमाप संधी; तिसऱ्या तिमाहीत IPO चा पूर, ८० हजार कोटींचे इश्यू धडकणार
कमॉडिटी बाजारात या आधी शुक्रवारी घसरण दिसून आली होती. तर गुरुवारी तेजीहोती. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १८० रुपयांनी कमी झाला होता. अखेर तो सावरला आणि बाजार बंद होताना सोन्याचा भाव २१ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह ४६५०० रुपयांवर स्थिरावला होता. चांदीमध्ये तेजी दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ९०८ रुपयांच्या तेजीसह ६०५२५ रुपयांवर स्थिरावला होता.

गुरुवारी सोन्याचा भाव ७७५ रुपयांनी वधारला आणि ४६७६९ रुपयांवर स्थिरावला होता. एक किलो चांदीचा भाव १२१४ रुपयांनी वधारला आणि तो ५९६०० रुपयांवर बंद झाला होता.

तेजी परतली; सेन्सेक्सची ६०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांची एक लाख कोटींची कमाई
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४९० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४६४९० रुपये इतका झाला. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६५० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९८०० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३८२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७८०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८७०० रुपयांवर स्थिर आहे.

पँंडोरा पेपर्सनं उडवली जगभरात खळबळ; करचुकव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीय
भारतीय बाजाराचा विचार केला तर सोन अजूनही त्याच्या विक्रमी पातळीच्या तुलनेत १०००० रुपयांनी स्वस्त आहे. आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७५९ डॉलर प्रती औंस आहे. त्यात किंचित घसरण झाली. चांदीमध्ये मात्र तेजी आहे. आज चांदीचा भाव ०.१ टक्के घसरला असून तो प्रती औंस २२.५ डॉलर झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: