Video : नितीश राणानं चौकार लगावत तोडला कॅमेरा; राशिद खानही झाला हैरान


कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१च्या ४९ व्या सामन्यात फलंदाजाने मैदानातील एका कॅमेऱ्याला नुकसान पोहोचवले. कोलकाताचा डावखुरा फलंदाज नितीश राणाने एक चेंडू टोलावला. चौकार गेलेला हा चेंडू सीमारेषेबाहेर असलेल्या कॅमेऱ्यावर जाऊन आदळला. त्यामुळे त्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. यावेळी त्या दिशेला क्षेत्ररक्षण करत असलेल्या राशिद खानची प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे.

वाचा-पँडोरा पेपर: सचिन तेंडुलकरने खरच कर चुकवेगिरी केली का? मास्टर ब्लास्टरने दिले उत्तर

कोलकाताच्या डावातील १७ वे षटक चालू होते. जेसन होल्डर गोलंदाजी करत होता. त्यावेळी नितीश राणाने होल्डरच्या गोलंदाजीवर एक चौकार लगावला. राणाने मारलेला एक चेंडू सीमा ओलांडून थेट कॅमेऱ्याच्या लेन्सवर आदळला. यावेळी राशिद त्याच दिशेला क्षेत्ररक्षण करत होता. कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याचे पाहून राशिदलाही वाईट वाटले. तो कॅमेऱ्याचे किती नुकसान झाले आहे, ते काही वेळ ते पाहात होता.

वाचा- Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण

वाचा- आयपीएलIPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार

चौकार लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर राणा बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. शुभमन गिलने कोलकाताकडून सर्वाधिक धावा केल्या. गिलने ५१ चेंडूत ५७ धावा केल्या. गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखत पराभव केला. हैदराबादने दिलेले ११६ धावांचे लक्ष्य त्यांनी १९.४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गिल बाद झाल्यानंतर केकेआरचा डाव गडबडला होता, पण नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

वाचा-पराभवानंतर भावूक झाला कर्णधार; हव तर ऑरेंज कॅप घ्या…

दरम्यान, दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या डावाची सुरवात खराब झाली. २१ चेंडूत २६ धावांची खेळी करणारा कर्णधार विल्यमसन हैदराबादकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कोलकाताच्या वरुण चक्रवर्ती, टीम साउदी यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: