‘शेतकऱ्यांमध्ये प्रचंड क्रोध, भाजप नेत्यांनी यूपी ग्रामीण भागाचा दौरा टाळावा’


हायलाइट्स:

  • ‘शेतकरी आंदोलना दरम्यान भाजपकडून हिंसा भडकावण्याचा प्रयत्न’
  • भाजप नेत्यांनी यूपीच्या ग्रामीण भागांचा दौरा टाळावा, टिकैत यांचा इशारा
  • सिसौलीमध्ये नरेश टिकैत यांचं वक्तव्य

मुजफ्फरपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागात घडलेल्या हिंसक घटनेनंतर भारतीय किसान युनियन (BKU) चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना धोक्याचा इशारा दिलाय. कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना टाळण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागाचा दौरा टाळण्याचा सल्ला राकेश टिकैत यांनी दिलाय. रविवारी रात्री सिसौलीमध्ये ते बोलत होते.

भारतीय किसान युनियनच्या मुख्यालयात एका शेतकरी सभेला संबोधित करताना टिकैत यांनी भाजपला इशारा दिलाय. लखीमपूर खीरी भागात घडलेल्या घटनेनंतर रविवारी रात्री उशिरा सिसौलीमध्ये नरेश टिकैत यांच्या निवासस्थानी आपात्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी, त्यांनी भाजपवर हिंसा भडकावत शेतकरी आंदोलनाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय.

भाजप नेत्यांना इशारा

शेतकरी चिडलेले आहेत. भाजप सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा क्रोध अनावर झालेला आहे. त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अप्रिय घटना टाळण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यातील ग्रामीण क्षेत्राचा दौरा टाळावा, असं टिकैत यांनी रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर म्हटलंय.

lakhimpur kheri violence : लखीमपूर प्रकरणी योगी सरकारचा मोठा निर्णय; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ४५ लाखांची मदत जाहीर
Lakhimpur Violence: मुलगा घटनास्थळी नव्हताच, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा दावा
भाजप सरकारवर टीका

लखीमपूर घटनेतून सरकारनं आपला अमानवीय चेहरा समोर आल्याचीही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडता आलं नाही त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांनाच गाडीखाली चिरडू लागलंय, अशी टिप्पणी टिकैत यांनी केली.

शेतकऱ्यांना आवाहन

सोबतच, शेतकऱ्यांनी रस्ते बंद करून नयेत, तसंच करून कोणत्याही किंमतीत आंदोलन हिंसक होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन नरेश टिकैत यांनी आंदोलकांना केलंय.

रविवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर दौऱ्यादरम्यान हिंसाचाराची घटना घडली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार शेतकऱ्यांसहीत भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचाही समावेश आहे.

Lakhimpur violence: ‘मला सोडा, जाऊ द्या…’, लखीमपूर हिंसाचारात मंत्र्यांच्या ड्रायव्हरचा नाहक बळी?
​VIDEO: ‘हात तर लावून दाखवा’, लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: