बैलगाडी चालकां विरूध्द बेकायदेशीर वाळू उपसा आणि चोरीचा गुन्हा दाखल

बैलगाडी चालकांविरूध्द बेकायदेशीर वाळू उपसा आणि चोरीचा गुन्हा दाखल
Filed a case of illegal sand extraction and theft against bullock cart drivers
 पंढरपूर - पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दि .०३/०५ /२०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपुर विभाग व पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली सपोफौ मुंडे ,पोना/२१६ आतार,पोकॉ/५७३ बाबर, पोकॉ/९६७ काळे असे वाखरी बीटमध्ये कोरोना प्रार्दुभावाचे अनुषंगाने बंदोबस्ताकरीता पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,मौजे शिरढोण ता.पंढरपूर गावातील अक्षय भुसनर व सुशांत भुसनर हे भिमा नदीचे पात्रातुन अवैधरित्या वाळुचा उपसा करुन बैलगाडीच्या सहाय्याने वाहतुक करीत आहेत .लगेच नमुद कर्मचारी हे त्यांचेकडील खाजगी वाहनाने शिरढोण गावाकडे जात असताना गावातील खंडोबा मंदीराजवळुन एक बैलगाडी जाताना दिसल्याने पोलीस पथकाला त्याचा संशय आल्याने सदर बैलगाडी थांबवण्याचा त्यांनी इशारा केला असता बैलगाडी चालक व त्याचेबरोबर असणारा एक इसम पोलीसांना पाहून बैलगाडी जागीच सोडून पळून गेला . सदर बैलगाडीमध्ये पाहीले असता त्यात पांढर्‍या रंगाचे सिमेंटचे अर्धवट पोते भरलेले दिसले ते उघडुन पाहीले असता त्यात वाळु भरल्याचे दिसुन आले .ती वेळ दुपारी ०४:०० वाजताची होती . बैलगाडी चालकाचे व पळुन गेलेल्या इसमाचे नाव व पत्त्याबाबत आजुबाजुला चौकशी केली असता त्याचे नाव अक्षय भुसनर व सुशांत भुसनर दोघे रा.शिरढोण ता.पंढरपूर असे असल्याचे समजले . सदर बैलगाडीचे हौदयामध्ये पाहीले असता त्यात २० पांढर्‍या रंगाचे सिमेंटच्या पोत्यामध्ये अर्धवट पोते भरलेली वाळू मिळून आली . सदरची बैलगाडी वाळूसह गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून लावलेली आहे . 

सदर मिळुन आलेल्या बैलगाडीचे बैल हे पोलीस ठाणेस ठेवणे गैरसोयीचे असल्याने बैलांना गोपाळदास गोशाळा ता.पंढरपूर येथे जमा केले आहेत . सदर बैलगाडी व वाळु तसेच बैल असे एकुण ५४,५०० / – रू.असा मुददेमाल जप्त करण्यात आला असून बैलगाडी चालक अक्षय भुसनर व सुशांत भुसनर दोघे रा.शिरढोण ता. पंढरपूर यांचे विरूध्द भिमानदीचे पात्रातून पर्यावरणाचा -हास करुन विना परवाना अवैधरित्या वाळूची चोरी व उत्खनन करून वरील वर्णनाची व किंमतीची वाळु वाहतुक करून पळून गेला आहे . म्हणून त्याच्याविरूध्द पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.१४१ /२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ ,३४ सह गौण खनिज कायदा १९७८ कलम ४१) , ४ (क) ९) व २१ प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ,पंढरपुर विभाग , पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली सपोफौ मुंडे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: