अफगाणिस्तान: काबूलमधील मशिदीजवळ भीषण स्फोट; पाच ठार


काबूल: काबूलमधील एका मशिदीच्या प्रवेशद्वारावर रविवारी शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकेच्या सैन्याने पूर्ण माघार घेतल्यानंतर झालेला हा पहिला मोठा हल्ला आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांचा एकूण आकडा समजू शकला नाही. हा स्फोट इस्लामिक स्टेट-खोरसान (आयएस-के) संघटनेने केला असल्याचे म्हटले जात आहे.

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याच्या आईच्या मृत्यूनंतर, तिच्या स्मरणार्थ धार्मिक विधी करण्यात येत ते. त्यावेळी ईदगाह मशिदीमधये है स्फोट झाला. या स्फोटामध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांना कोणतीही इजा झालेली नाही. मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तालिबानचा प्रवक्ता बिलाल करिमी याने सांगितले. या स्फोटानंतर घटनास्थळाची नाकेबंदी करण्यात आली. तसेच, हा परिसर स्वच्छ करण्यात आला. घटनास्थळावर आता फक्त प्रवेशद्वारावरील स्फोटाच्या खुणाच उरल्या असल्याचे सांगण्यात आले.

तालिबानला चीनकडून ३.१ कोटी डॉलरची मदत; मदतीचे साहित्य सुपूर्द

‘टीटीपी’चा पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; पाच जवान ठार
या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. मात्र, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा घेतल्यापासून ‘इस्लामिक स्टेट खोरासन’कडून हल्ले करण्यात येत आहेत. यामध्ये काबूल विमानतळावर हल्ला करण्यात आला होता. त्यात १६९ अफगाण नागरिकांसह १३ अमेरिकी सैनिक मृत्युमुखी पडले होते.

पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया

दोहा कराराच्या गोपनीयतेवर प्रश्न

तालिबानला अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून ५० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, कोणत्याही देशाने त्यांच्या सरकारला मान्यता दिलेली नाही. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये झालेला दोहा करार थंड्या बस्त्यामध्ये पडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात होत असलेल्या मानवाधिकारांच्या भंगांसाठीही दोहा करारालाच दोषी ठरविण्यात येत आहे. विशेषत: दोहा करारातील अटींविषयीच्या गोपनीयतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भारतानेही याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: