पँडोरा प्रकरण: मुशर्रफ यांच्यासोबतच्या ‘डील’नंतर हिंदी चित्रपटांवरील बंदी हटवली?


इस्लामाबाद: पँडोरा पेपर लीक प्रकरणात जगभरातील राजकीय नेते, सेलिब्रेटी, विविध देशांतील अधिकारी, उद्योजकांची नावे समोर आली आहेत. पाकिस्तानमध्येदेखील पँडोरा पेपर लीक प्रकरणावरून खळबळ माजली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळील व्यक्तींसह जवळपास ७०० व्यक्तींचे नावे या पेपर लीकमध्ये आली आहेत. तर, दुसरीकडे आता पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.

पँडोरा पेपर लीकमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सन २००७ मध्ये पाकिस्तानचे जनरल आणि तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे सहाय्यक शफात उल्लाह शाह यांच्या पत्नाीने लंडनमध्ये जवळपास १.२ कोटी डॉलर किंमतीचे अपार्टमेंट खरेदी केले होते. या व्यवहारात परदेशी चलनाची देवाण-घेवाण करण्यात आली. शाह यांच्या पत्नीला हा फ्लॅट एका परदेशी कंपनीचा मालक आणि व्यापारी अकबर आसिफ यांनी विकला होता. आसिफ हे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असून लंडन आणि दुबईत त्यांची रेस्टोरंट्स आहेत.

पँडोरा गौप्यस्फोट: पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधक अडचणीत
आसिफ हे भारतीय चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. आसिफ यांचे चिरंजीव आहे. आसिफ यांनी लंडन येथील Dorchester येथील हॉटेलमध्ये मुशर्रफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर असलेल्या बंदीचा विषय मांडला होता. त्याशिवाय, त्यांनी आपले वडील के. आसिफ यांनी दिग्दर्शित केलेला सुप्रसिद्ध चित्रपट मुगल-ए-आझम प्रदर्शित करण्याची मागणी केली होती. मुशर्रफ यांनी ही मागणी मान्य करत चित्रपट प्रदर्शनाला मंजुरी दिली. चित्रपटावरील बंदीही हटवण्यात आली होती.

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा ‘पँडोरा’ गौप्यस्फोट; जगभरात खळबळ
पँडोरा पेपरलीकमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या लोकांसह लष्करी अधिकारी, विरोधी पक्षातील नेत्यांसह जवळपास ७०० जणांच्या नावांचा समावेश आहे. यांची मालमत्ता परदेशात शेल कंपन्यांच्या स्वरूपात असल्याचा आरोप आहे.

विश्वास बसणार नाही!, ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ‘इतक्या’ कमी किंमतीत मिळतोय, पाहा डिटेल्स
‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स’ने (आयसीआयजे) ‘पँडोरा पेपरलीक’द्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. पँडोरा पेपर्स लीकमध्ये पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि विरोधकांच्या नावांचा समावेश आहे. जगभरातून ११९ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा ‘आर्थिक गैरव्यवहार’ जगासमोर उघड झाला आहे. ११७ देशांतील ६०० पत्रकार ‘पँडोरा पेपर लीक’च्या तपासात सहभागी होते, असे ‘आयसीआयजे’ने सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: