Who is Umran Malik? भारताला मिळाला ब्रेट ली, जाणून घ्या कोण आहे १५० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा उमरान मलिक
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी झालेल्या लढतीत उमरानने पदार्पण (Umran Malik IPL debut) केले. त्याने पहिल्याच षटकात १५० किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू पाहिल्यानंतर समालोचक देखील हैरान झाले. त्याने पहिल्या षटकात १४५, १४१.५, १५०, १४७, १४३, १४१ इतक्या वेगाने चेंडू टाकला.
वाचा- पँडोरा पेपर: असे काय केले ज्यामुळे सचिनचे नाव समोर आले, जाणून घ्या सत्य
वाचा- IPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार
पहिल्या षटकात वेगवान कामगिरी करणाऱ्या उमरानने पदार्पणातच आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने तिसऱ्या षटकात केकेआरचा सलामीवीर शुभमन गिल याला १५१.१ इतक्या वेगाने चेंडू टाकला.
वाचा- Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण
उमरानला त्याच्या ४ षटकात एकही विकेट मिळाली नाही. त्याने २७ धावा दिल्या. आयपीएलमध्ये पदार्पण करण्याआधी उमरानने फक्त २ देशांतर्गत सामने खेळले आहेत.