lakhimpur kheri violence : ममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा; म्हणाल्या, ‘यूपीत ‘राम राज्य’ नव्हे, तर ‘किलिंग राज्य”


कोलकाताः उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक (lakhimpur kheri violence ) होणार आहे. ही निवडणूक जवळ येत असतानाच यूपीत लखीमफूर खिरीमध्ये हिंसाचार झाला. या घटनेत ४ शेतकऱ्यांचासह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरून यूपीतील योगी सरकारसह सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्ष तुटून पडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टीसह अनेक पक्षांनी निशाणा साधला आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात ‘राम राज्य’ असल्याचा दावा भाजपा करते. पण तिथे ‘राम राज्य’ नाही, ‘किलिंग राज्य’ आहे. लोक मारलं जातंय आणि सरकार जमावबंदी लागू करते. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांची हत्या केली. आम्ही त्याचा निषेध करतो, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यापूर्वी लखीमपूर खिरीच्या तिकोनिया भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला. यात चार शेतकऱ्यांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झालला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी अजय मिश्रा यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…

दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हिसांचार प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच घटनेतील मृत ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं आहे.

navjot singh sidhu detained : लखीमपूर हिंसाचार; सिद्धूंना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुख्यमंत्र्यांना योगी सरकारचा झटकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: