पॅंडोरा पेपर्स प्रकरण ; केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल, अर्थ मंत्रालयाला दिले हे आदेश


हायलाइट्स:

  • पँडोरा पेपर्सने सात गोपनीय पत्रांचा तपशील उघड केला.
  • जवळपास ३०० हून अधिक भारतीयांनी कर चुकवेगिरीसाठीगैरप्रकार केले.
  • तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पँडोरा पेपर्सने सात गोपनीय पत्रांचा तपशील उघड केला असून पनामा पेपर्स प्रकरणानंतर जवळपास ३०० हून अधिक भारतीयांनी कर चुकवेगिरीसाठी केलेल्या गैरप्रकारांची इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने आज वृत्त प्रकाशित केले आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे अर्थ मंत्रालयाने आज संध्याकाळी जाहीर केले.

कर चुकवेगिरीसाठी किंवा काळा पैसा दडवण्यासाठी कर चुकवेगिरीसाठी नंदनवन असलेल्या देशांमध्ये किंवा स्वतंत्र बेटांवर ट्रस्ट ,बनावट कंपन्या स्थापन करून संपत्ती दडवली असल्याचे पँडोरा पेपर्सने केलेल्या शोध मोहिमेतून समोर आले आहे. पँडोरा पेपर्स लीकशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

ऊर्जा क्षेत्रात अदानींची आगेकूच; तब्बल २६ हजार कोटी मोजून खरेदी केली ‘ही’ कंपनी
या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कायदेशीर तपास करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. हा तपास एकापेक्षा अधिक यंत्रणांकडून केला जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली सीबीडीटी, ईडी, आरबीआय आणि एफआययू या यंत्रणा काम करतील, असे अर्थ मंत्रालयाने आज जाहीर केले.

तेजी मंदीचा खेळ; कमॉडीटी बाजारात सोने-चांदीमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव
आज प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीमध्ये दिवाळखोरीत निघालेल्या अनिल अंबानीपासून फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा समावेश आहे. भारतातून पलायन करण्यापूर्वी नीरव मोदी याच्या बहिणीने एक महिना आधीच परदेशात कशी ट्रस्ट स्थापन केली याची माहिती या मोहीमेदरम्यान हाती लागली आहे. तसेच नीरा राडिया, अभिनेता जॅकी श्राॅफ, कॅप्टन सतीश शर्मा, इक्बाल मिर्ची, विनोद अदानी, किरण मझुमदार शाॅ, समीर थापर, अजित केरकर, पूर्वी मोदी या भारतीयांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

गुंतवणुकीच्या अमाप संधी; तिसऱ्या तिमाहीत IPO चा पूर, ८० हजार कोटींचे इश्यू धडकणार
इंटरनॅशनल कन्सोर्शियम आॅफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने केलेल्या विशेष शोध मोहीम केली. या दरम्यान कर चुकवेगिरीचे नंदनवन असलेल्या देशातील १४ कंपन्यांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १ कोटी २० लाख दस्त आणि २९ हजार मालकी कंपन्यांची गोपनीय माहिती तपासली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे. या संपूर्ण प्रकरणी केंद्र सरकार विविध देशांशी संपर्कात आहेत. त्यांच्याकडून संबंधित व्यक्तींच्या व्यवहारांचा तपशील घेतला जात असल्याचे सीबीडीटीने म्हटलं आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: