facebook whatsapp instagram suffer major global outage : जगभरात फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे सर्वर डाउन, सेवा ठप्प


नवी दिल्लीः फेसबुक आणि तिच्या सहकारी कंपन्या व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे सर्वर जगभरात डाउन झाले आहे. भारतात रात्री ९ वाजेपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प ( Facebook, WhatsApp, Instagram suffer major global outage ) आहे. युजर्सनी मोबाइल ॅपवरूनही प्रयत्न केला. पण कुठेही ते काम करत नसल्याने अनेक युजर्सनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ठप्प असल्याचं समोर आलं.

सोशल मीडिया साइट्स ट्विटवर हे ट्रेंडमध्ये आहे. फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम सेवा संपूर्ण जगभरात ठप्प आहे. सेवा ठप्प होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम काम करत नसल्याचं कळताच अनेकांनी ट्विटरवर येऊन तपास करत आहेत. ट्विटरवर अनेकांनी फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्राम चालत नसल्याचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. फेसबुक, व्हट्सअॅप आणि इन्स्टग्रामची सेवा ठप्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

priyanka gandhi : प्रियांका गांधी नजरकैदेत, खोली झाडतानाचा व्हिडिओ व्हायरल; आमरण उपोषण सुरू

दरम्यान, काही मिनिटांपूर्वी फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून युजर्सना माहिती दिली आहे. अनेक युजर्सना अॅप आणि तर प्रोडक्ट्स वापरण्यात अडचणी येत आहेत. पण लवकरच सेवा सुरू होईल. तसंच युजर्सना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत. लवकरच सेवा सामान्य होईल, असं फेसबुकने म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: