supreme court : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा सांगितले लोकमान्य टिळकांचे ते शेवटचे शब्द…


नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टात ( supreme court ) एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी अचानक वातावरण पूर्णपणे बदलले. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू होती. यावेळी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या मागे असलेल्या ऐतिहासिक चित्राचा उल्लेख केला. रिअल इस्टेट डेव्हलपर सुपरटेकच्या याचिकेवर कोर्ट सुनावणी करत होते. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे कंपनीचे प्रतिनिधित्व करत होते.

माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मुकुल रोहतगी यांच्या कार्यालयातील पेंटिंगची न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी प्रशंसा केली. ‘बाळ गंगाधर टिळकांच्या खटल्याच्या सुनावणी वेळी हा मुंबई हायकोर्टातील मध्यवर्ती हॉल आहे’, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. याबद्दल माजी अॅटर्नी जनरल रोहतगी यांनी कौतुक केल्याबद्दल आभार मानले.

एवढचं नाही तर लोकमान्य टिळक त्या खटल्यावेळी काय म्हणाले होते, हे ही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं. ‘ज्युरींनी निकाल दिला असला तरी मी निर्दोष आहे, यावर माझा विश्वास आहे. पुरुष आणि राष्ट्रांच्या भवितव्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मोठ्या शक्ती आहेत. देवाची इच्छा असू शकते, की मी ज्या उद्देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे ते माझ्या स्वतंत्र होण्याच्या तुलनेत माझ्या दुःखातून अधिक समृद्ध होईल.’

supreme court : ‘नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती असतानाही शेतकऱ्यांचे आंदोलन का?’

लोकमान्य टिळकांवर १९०७ मध्ये मुंबई हायकोर्टात खटला चालवण्यात आला होता. या खटल्याचे चित्र पाहून न्यायमूर्ती चंद्रचूड उत्साहित झाले आणि त्यांनी हे सर्व सांगितले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अनेक वर्षे मुंबई हायकोर्टात वकिली केली. नंतर त्यांची मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

farmers protest supreme court : शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्ट बरसले; म्हणाले, ‘तुम्ही शहराचा ग

टिळकांचे शेवटचे शब्द असलेला एक फलक आणि त्यांच्या ऐतिहासिक खटल्याच्या दृश्याचे चित्रण करणारे चित्र सेंट्रल कोर्टाबाहेर मुंबई हायकोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. इथे लोकमान्य टिळकांवर खटला चावण्यात आला होता. मुंबई हायकोर्टात असताना टिळकांचे हे शब्द आपण रोज वाचत होतो, असं न्यायमूर्ती चंद्रचूड यावेळी म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: