शेत तलावात बुडून दोन बहिणींचा मृत्यू; खेळत असतानाच…


हायलाइट्स:

  • शेत तलावात बुडून दोन बहिणींचा मृत्यू.
  • खेळताना पाय घसरून तलावात पडल्या.
  • कुही तालुक्यातील शिकारपूर येथील घटना.

नागपूर: खेळता खेळता तलावात बुडून दोन बहिणींचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना कुही तालुक्यातील शिकारपूर येथे रविवारी दुपारी घडली. आकांक्षा विचारकर मांढरे (वय ५) व तिची बहीण आराध्या (वय २) अशी मृतांची नावे आहेत. ( Two Sisters Drowned In Nagpur )

वाचा: अहमदनगरमधील ६१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन सुरू; पहिल्याच दिवशी…

शिकारपूर मध्ये पाच एकर जागेवर शेत तलाव आहे. विचारकर हे शेतमजुरी व तलावाची देखभाल करतात. तलावाला लागूनच त्यांचे घर आहे. रविवारी सकाळी विचारकर, त्यांच्या पत्नी व आई शेतात कामाला गेले. घरी विचारकर यांची ८५ वर्षीय आजी होती. आकांक्षा व आराध्या या दोघी तलावाजवळ खेळत होत्या. खेळता-खेळता पाय घसरून दोघी तलावात पडल्या आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

वाचा: आर्यनकडे ड्रग्जचा साठा व मोठी रोकड; अ‍ॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

दरम्यान, मुली न दिसल्याने विचारकर यांच्या आजी घराबाहेर आल्या. त्यांना आराध्याचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. त्यांनी आराध्याला बाहेर काढले. याचदरम्यान विचारकरही घरी आले. त्यांनी आकांक्षाचा मृतदेह बाहेर काढला. एका नागरिकाने घटनेची माहिती वेलतूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांच्यासह वेलतूर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी पंचनामा करून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना केले. एकाच वेळी दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने मांढरे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वाचा: क्रूझ गोव्यातून मुंबईत परतताच पुन्हा मोठी कारवाई; ‘ते’ फरार प्रवासी कोण?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: