राजूरकर पती पत्नीचे दुःखद निधन
राजूरकर पती पत्नीचे दुःखद निधन Tragic death of Rajurkar husband and wife
पंढरपूर / नागेश आदापूरे - येथील गुरुकृपा सोसायटीमधील शरद विश्वनाथ राजूरकर यांचे तसेच त्यांच्या पत्नी सुरेखा शरद राजूरकर यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले.
शरद राजूरकर हे कवठेकर प्रशालामध्ये नोकरीस होते.अतिशय प्रामाणिकपणे व कष्टाने त्यांनी आपली सेवा बजावली व सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा स्वभाव हा अतिशय शांत प्रेमळ व संयमी होता त्यामुळे त्यांना शाळेत व गल्लीत आदराने आबा असे म्हणत.पती पत्नीच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,दोन जावई, भाऊ, बहिण,पुतणे,नातवंड असा मोठा परिवार असून दोघांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ज्ञानप्रवाह न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.