IPL मध्ये भारतीय क्रिकेटपटू ढसाढसा रडला, राशिद खानने शेअर केला व्हिडिओ


अबूधाबी: अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर जेव्हा एखाद्या खेळाडूला संघाकडून खेळण्याची संधी मिळते तेव्हा तो क्षण भावनिक असतो. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून जम्मू-काश्मीरचा उमरान मलिकने पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात ४ षटकात २७ धावा दिल्या. उमरानला कोणतीही विकेट मिळाली नसली तरी या सामन्यात त्याने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला.

वाचा-RR Vs MI Match Preview: आज मुंबई इंडियन्सच्या चुकीला माफी नाही; कारण…

उमरानने पदार्पणाच्या सामन्यात या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. एका बाजूला उमारनच्या या कामगिरीने सर्वजण त्याचे कौतुक करत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उमरान ढसाढसा रडताना दिसतोय. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

वाचा-Video: IPL मधील बेस्ट बॉल; चेंडू असा वळाला की फलंदाजासह सर्व झाले हैराण

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढती आधीचा हा व्हिडिओ आहे. सामना सुरू होण्याच्या आधी उमरानला त्याच्या कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या. कुटुंबातील लोकांच्या शुभेच्छा स्विकार करताना उमरान भावूक झाला आणि रडू लागला. हा व्हिडिओ शेअर करताना राशिद म्हणतो, काल सामना सुरू होण्याच्या ठिक आधी शुभेच्छा स्विकारताना आमचा युवा खेळाडू भावूक झाला.

वाचा- पाहा पदार्पणाच्या सामन्यात काश्मीच्या गोलंदाजाने काय केले

उमरानने १५१ किमीच्या वेगाने चेंडू टाकून सर्वांना धक्का दिला. त्याला विकेट मिळाली नसली तरी भविष्यातील तो भारताचा महत्त्वाचा खेळाडू होऊ शकतो अशी आशा चाहत्यांना वाटत आहे. उमरानने पदार्पणातील पहिलाच चेंडू १५० किमीच्या वेगाने टाकला होता. भारतीय गोलंदाजाकडून टाकण्यात आलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होताना तो संघात नेट बॉलर म्हणून होता. पण टी नटराजनला करोनाची लागण झाल्याने उमरानचा संघात समावेश करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: