मित्रांसोबत पोहायला गेले होते, घरी परतलेच नाहीत; नंतर कळलं की…


हायलाइट्स:

  • पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
  • मुंबईतील मलबार हिल जवळच्या समुद्रात घडली घटना

मुंबई: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मलबार हिल जवळच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. (Two boys drowned near Malabar Hill in Mumbai)

रेहमान रिझवान शेख (वय १५) आणि मोहम्मद दिलशाद शेख (वय १२) अशी मरण पावलेल्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही सोमवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत नेपीयन सी रोडच्या परिसरातील समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेले होते. पोहायला गेलेल्यांमध्ये एकूण आठ मुलांचा समावेश होता. पोहत असताना रेहमान व मोहम्मद हे अचानक बेपत्ता झाले. सोबत असलेल्या मुलांनी ही बाब नातलगांना कळवली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. ते दोघे सापडताच त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा:

काँग्रेसनं स्वीकारलं भाजपचं आव्हान; देगलूरमध्ये ‘काँटे की टक्कर’

‘…तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: