लखीमपूर हिंसा : जबरदस्त जखमा, ब्रेन हॅमरेजमुळे आठ मृत्यू; शवविच्छेदन अहवालात स्पष्ट


हायलाइट्स:

  • आठ मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल समोर
  • जबरदस्त जखमा, धक्का, ब्रेन हॅमरेज ठरलं मृत्यूचं कारण
  • प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांन ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई

लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या आठ मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट स्वरुपात समोर येतंय. शवविच्छेदन अहवालात कुणाचाही मृत्यू गोळी लागून झालेला नसल्याचं उघड झालंय. सोमवारी या आठही मृतदेहांचं शवविच्छेदन पार पडलं होतं.

लवप्रीत सिंह (शेतकरी)
– फरफटत गेल्यामुळे मृत्यू, शरीरावर जखमांचे अनेक निशान, जोरदार धक्का आणि ब्रेन हॅमरेज ठरलं मृत्यूचं कारण

गुरविंदर सिंह (शेतकरी)
– दोन घातक जखमा आणि फरफटत गेल्याच्या खुणा, धारदार किंवा टोकदार वस्तूनं जबरदस्त जखम, जोरदार धक्का आणि ब्रेन हॅमरेज

दलजीत सिंह (शेतकरी)
– शरीरावर अनेक ठिकाणी फरफटत गेल्याच्या खुणा, हेच मृत्यूचं कारण ठरलं

छत्र सिंह (शेतकरी)
– मृत्यूपूर्वी धक्का, ब्रेन हॅमरेज आणि कोमात, फरफटत गेल्याच्याही खुणा

शुभम मिश्रा (भाजप नेता)
– लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण, शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निशाण

हरिओम मिश्रा (केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा वाहनचालक)
– काठ्यांनी-लाथाबुक्क्यांनी मारहाण, शरीरावर अनेक ठिकाणी जखमा

श्याम सुंदर (भाजप कार्यकर्ता)
– जबर मारहाण, फरफटत नेल्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी जखमा

रमन कश्यप (स्थानिक पत्रकार)
– शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या गंभीर खुणा, धक्का आणि ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

दरम्यान, सोमवारी प्रशासन आणि शेतकऱ्यांत झालेल्या चर्चेनंतर हिंसाचारात मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या पीडित कुटुंबांना प्रत्येकी ४५ लाख रुपये नुकसान भरपाई तसंच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. सोबतच, हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तींना १० लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती करतील.

Lakhimpur Violence: ‘शेतकऱ्यांमध्ये प्रचंड क्रोध, भाजप नेत्यांनी यूपी ग्रामीण भागाचा दौरा टाळावा’
supreme court : ‘नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती असतानाही शेतकऱ्यांचे आंदोलन का?’
Lakhimpur Violence: मुलगा घटनास्थळी नव्हताच, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा दावा
Lakhimpur violence: ‘मला सोडा, जाऊ द्या…’, लखीमपूर हिंसाचारात मंत्र्यांच्या ड्रायव्हरचा नाहक बळी?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: